व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीरंग बारणेंचे टेन्शन वाढले; राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपचाही मावळ लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याचा निर्धार! Maval Lok Sabha 2024

लोणावळा (ता. मावळ) येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक नुकतीच संपन्न झाली. Maval Lok Sabha Election 2024.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 25, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-Lok-Sabha-Election-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा (ता. मावळ) येथे मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीची कोअर कमिटीची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार असावा असा एकमुखी निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली. या बैठकीला मावळ लोकसभा मतदार संघातील भाजपाचे सर्वच प्रमुख नेते, पदाधिकारी मंडळी उपस्थित होती. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे तिन्ही पक्ष सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे खासदार श्रीरंग बारणे हे सध्याचे मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार आहेत, आणि ते तिसऱ्या टर्मसाठी इच्छुक असून तशी वाटचाल त्यांनी सुरु केली आहे. परंतू अजितदादा गटाचे मावळचे विद्यमान आमदार सुनिल शेळके हे वारंवार मावळ लोकसभेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू असा विश्वास जाहीररित्या व्यक्त करत आहेत, तर दुसरीकडे भाजपानेही मावळ लोकसभेवर कमळ फुलवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मावळ लोकसभेची निवडणूक ही अधिक रंजक आणि चुरशीची होणार, ही गोष्ट नक्की आहे. तसेच राष्ट्रवादी दादा गटापाठोपाठ भाजपानेही मावळ लोकसभेवर दावा सांगितल्याने खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढले आहे. (Maval Lok Sabha Constituency Election 2024 Party Officers Determination To Elect BJP MP Here)

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपचीच ताकद अधिक असल्याने ही जागा भाजपाकडे राहावी, अशी मागणी भाजपच्या कोअर कमिटीच्या लोणावळा येथील बैठकीत आक्रमकपणे करण्यात आली. याठिकाणी आयात उमेदवार न देता पक्षाचाच असावा, असाही आग्रह धरण्यात आला. पक्षाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची किती ताकद आणि कशी ताकद जास्त आहे. हे तिथे पक्षाचे आमदार आणि नगरसेवकांच्या संख्या सांगत समप्रमाणात दाखवून दिल्याने दावा अधिक मजबूत बनवला आहे. त्यामुळे महायुतीतच मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा नेमकी कुणाला मिळणार, हे पाहावे लागेल.

अधिक वाचा –
– महाराष्ट्रातील ‘या’ सहा उमेदवारांची राज्यसभेच्या सदस्यपदी निवड; पाहा नवनिर्वाचित 6 खासदारांची नावे । Rajya Sabha Election 2024
– वडगावमध्ये राष्ट्रवादीची आढावा बैठक; ‘मावळात दीड लाखाच्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणू’ – आमदार सुनिल शेळके
– ‘पोक्सो’ कायदा आणि ‘निर्भया’ योजनेबद्दल कान्हे शाळेतील विद्यार्थ्यांना वडगाव मावळ येथील पोलिस अधिकाऱ्यांकडून सखोल मार्गदर्शन


Previous Post

मोठी बातमी! हिंजवडीमधील 25 वर्षीय इंजिनियर तरुणाचा मावळमधील पवना धरणात बुडून मृत्यू, फांगणे गावाजवळील घटना । Maval News

Next Post

वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
sunil-shelke-vadgaon-maval

वडगाव मावळ शहरात आमदार सुनिल शेळके यांचा भव्य नागरी सत्कार । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
Big relief for students Deadline to submit marksheet and school leaving certificate for 11th admission

विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्यास मुदत

May 31, 2026
youth who went for swimming in Pawana river near Parandavadi bridge in Maval taluka died

मावळ तालुक्यातील परंदवडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू

May 31, 2026
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.