व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवनानगर येथील संकल्प इंग्लिश स्कूलमध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेने सर्वजण थक्क

विज्ञानदिन साजरा करण्याबरोबर तो आचरणात आणणे अतिशय महत्त्वाचे - लक्ष्मण भालेराव

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in लोकल, ग्रामीण
Sankalp-English-School-Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘आजच्या जगात प्रत्येक घटकात आपल्याला विज्ञान पाहण्यास मिळते. अशी एकही गोष्ट नाही जिथे विज्ञान आणि गणित नाही. विज्ञानाने दैनंदिन जीवन व्यापून टाकले असले तरी अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम आहे. आपण विज्ञानदिन साजरा करतो हे तर महत्त्वाचे आहेच, परंतू आपण ते आचरणात आणणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे,’ असे मत संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी व्यक्त केले. संकल्प इंग्लिश स्कूल आयोजित विज्ञान प्रदर्शन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे (दि. 28 फेब्रुवारी) औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विज्ञान आणि गणित विषयावरील प्रकल्पाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये हायड्रॉलिक, इलेक्ट्रिक, शेतीविषयक, अवकाशविषयक,औषधीविषयक, गणितविषयक अनेक प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यात विद्यार्थ्यांनी बनविलेला गणित उद्यान हा प्रकल्प उपस्थितांना खूप आवडला. अशाच पद्धतीचे उद्यान आपल्या गावातही तयार करण्याचा मानस या प्रसंगी काले पवनानगरचे सरपंच खंडू कालेकर यांनी व्यक्त केला. ( 28th February Science Day Celebrated at Sankalp English School Pavananagar )

कार्यक्रमाला संचालक डॉ. संजय चौधरी, केंद्रप्रमुख डेंगळे सर, उपसरपंच रमेश कालेकर, माजी उपसरपंच अतुल कालेकर, उद्योजक मंगेश कालेकर, उद्योजक श्रीराम मोहोळ, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण आदी मान्यवर मंडळी आणि पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. काले केंद्रातील इतर शाळांनी देखील प्रदर्शनास भेटी दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर,आशा बोरकर, प्रियांका येवले, सुजाता वाघेरे, मोना गांधी यांनी विशेष मेहनत घेतली.

अधिक वाचा –
– स्वीडनहून थेट मावळात..! शिळींब गावात आले परदेशी पाहुणे, गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात केले स्वागत । Maval News
– मावळमधील डोंगरी भागातील शेतकऱ्यांना शेळीपालन विषयी प्रशिक्षण; शिबिरार्थी 554 शेतकऱ्यांना शेती अवजारांचे वाटप । Maval News
– मावळ तालुक्यातील आदिवासी पाड्यांवरील महिलांना व्यसनमुक्तीवर मार्गदर्शन; इनर व्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम


dainik maval jahirat

Previous Post

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाची मोठी कारवाई! अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News

Next Post

आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण । SSC Exam 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
SSC-Board-Exam-2024

आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात, पवनानगर केंद्रावर दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण । SSC Exam 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.