व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सराईत मोटारसायकल चोराला अटक, एक दोन नव्हे तब्बल 16 मोटारसायकली हस्तगत, 14 गुन्ह्यांची उकल । Pune Crime

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी एका सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 16 मोटारसायकली हस्तगत केल्या गेल्या आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 10, 2024
in लोकल, शहर
Motorcycle-thief-arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिसांनी एका सराईत मोटारसायकल चोराला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 16 मोटारसायकली हस्तगत केल्या गेल्या आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील एकूण 14 मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. योगेश शिवाजी दाभाडे (वय 24 वर्ष, रा. वळसाने, ता. साक्री, जि. धुळे) असे या चोराचे नाव आहे. त्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, नाशिक शहर आयुक्तालय, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, धुळे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एकंदर 17 मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले आहेत. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

भोसरी परिसरात मोटारसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याने भोसरी पोलिसांचे पथक याचा तपास करत होते. अनेक ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मोटारसायकल चोराची ओळख पटली. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने आपला साथीदार मॉन्टी वाघ (वय 22 वर्षे रा. दहिवत ता. चाळीसगाव, जि. जळगाव) याला बरोबर घेऊन भोसरी, चाकण, म्हाळुंगे, खडकी, तळेगाव दाभाडे, लोणीकंद, सांगवी परिसरात मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. 16 मोटार सायकली पोलिसांना काढून दिल्या. या मोटारसायकलींची किंमत सुमारे 3 लाख 84 हजार रुपये इतकी आहे. ( Motorcycle thief arrested 16 motorcycles seized 14 crimes solved Pimpri Chinchwad Police )

या चोराच्या अटकेमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील 07 गुन्हे, म्हाळुंगे पोलीस ठाण्यातील 02 गुन्हे, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, चाकण पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, सांगवी पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, खडकी पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, लोणीकंद पोलीस ठाण्यातील 01 गुन्हा, असे एकंदर 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त परिमंडळ 1 स्वप्ना गोरे, सहाय्यक आयुक्त पिंपरी विभाग विशाल हिरे, वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ चव्हाण, निरीक्षक रूपाली बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले, मुकेश मोरे, हवालदार हेमंत खरात, नाईक नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, मुळे, अंमलदार स्वामी नरवडे, सागर जाधव, आशिष गोपी, प्रभाकर खाडे, सचिन सातपुते, महादेव गारोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली.

अधिक वाचा –
– महावितरणच्या चाकण उपविभागाचे विभाजन; नवीन उपविभागासह दोन शाखा कार्यालयांची निर्मिती । Pune News
– कामशेत येथील पत्रकार चंद्रकांत लोळे यांचे प्रवासादरम्यान निधन । Journalist Chandrakant Lole passed away
– विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

‘द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड करा’, मावळ तालुका जमीन हक्क परिषदेचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Next Post

पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

पवन मावळ भागातील उर्से, आढे, सडवली, बऊर गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.