व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं, देशात सात टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी अंतिम मतमोजणी, वाचा A टू Z माहिती

देशातील सार्वत्रिक निवडणूका अर्थात लोकसभा निवडणूका 2024 ची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 मार्च) केली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 16, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र
Lok-Sabha-elections-2024

Photo Courtesy : Team Dainik Maval


देशातील सार्वत्रिक निवडणूका अर्थात लोकसभा निवडणूका 2024 ची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि. 16 मार्च) केली. दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, देशात लोकसभा निवडणूक 543 जागांवर निवडणूक होणार आहे. 7 टप्प्यात ही निवडणूक होणार असून पहिला टप्पा 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. तर अंतिम मतमोजणी ही 4 जून रोजी होणार आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

यंदा 18व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे. 2019 साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ 6 जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून 2 जून रोजी सात टप्पे संपणार आहेत. महाराष्ट्रातही 5 टप्प्यांत मतदान होणार आहे. ( Election Commission of India Announced Schedule for General Elections to Lok Sabha 2024 )

देशात एकूण 97 कोटी मतदार –
भारतात यंदा 96 कोटी 80 लाख मतदार आहेत. 19 कोटी 74 लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे. निवडणूकीसाठी 5 लाख मतदान केंद्र तयार आहेत. तसेच 1.5 कोटी निवडणूक कर्मचारी तैणात आहेत. एकूण 50 लाख ईव्हीएम मशीनद्वारे मतदान पार पडले. आयोगाने आतापर्यंत 400 विधानसभा निवडणूका घेतल्यात. तसेच 16 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूका झाल्या आहेत. गेल्या वर्षभरात 11 विधानसभा निवडणूका झाल्या आहेत, अशीही माहिती कुमार यांनी दिली.

देशात 82 लाख प्राऊड मतदार –
देशात 1.8 कोटी नवमतदार आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत. 82 लाख मतदारांचे वय 85 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर, 2 लाख मतदार असे आहेत ज्यांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त आहे. देशात 18 हजार ट्रान्सजेंडर मतदार आहेत. तसेच 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेले, दिव्यांगमध्ये ज्यांची श्रेणी 40 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म 12 डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल, अशीही माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

Schedule for General Elections to Lok Sabha 2024

Phase 1#GeneralElections2024 #MCC pic.twitter.com/IglWUjkcSK

— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024

देशात सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणार
फेज 1 – 19 एप्रिल
फेज 2 – 26 एप्रिल
फेज 3 – 7 मे
फेज 4 – 13 मे
फेज 5 – 20 मे
फेज 6 – 25 मे
फेज 7 – 1 जून
अंतिम मतदान – 4 जून

कोणत्या राज्यात किती टप्प्यांत मतदान?
– अरुणाचल प्रदेश, अंदमान-निकोबार, आंध्र प्रदेश, चंदीगढ, दादरा नगर हवेली, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, लक्षद्वीप, लडाख, मिझोराम, मेघालय, नागालँड, पुद्दुचेरी, सिक्कीम, तामिळनाडू, पंजाब, तेलंगणा, उत्तराखंड राज्यांत एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार.
– कर्नाटक, राजस्थान, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांमध्ये दोन टप्प्यांत मतदान प्रक्रिया होईल.
– छत्तीसगड, आसाममध्ये तीन टप्प्यांत मतदान होईल.
– ओडिशा, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यांमध्ये चार टप्प्यात मतदान होईल.
– महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान होईल.
– उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

General Election to Lok Sabha 2024 – All Phase Map pic.twitter.com/ils9MiK5U3

— Election Commission of India (@ECISVEEP) March 16, 2024

महाराष्ट्रातील मतदानाचे 5 टप्पे आणि मतदारसंघ –
️पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर️
दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले️
चौथा टप्पा – 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा – 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून मावळ तालुक्यातील अनेक गावांना विकास निधी । Maval MP Shrirang Barne
– लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर होणार! किती टप्पे? कधी मतदान? कधी मतमोजणी? सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार । Lok Sabha Elections 2024
– मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना वाचनालयासाठी पुस्तकांचे वाटप । Maval News


Previous Post

मावळ भाजपाचे लाभार्थी संपर्क अभियान, गावोगावी जाऊन केंद्र सरकारच्या लाभार्थ्यांशी साधणार संवाद । Maval BJP

Next Post

आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mla-sunil-shelke

आचारसंहिता लागण्याआधीच आमदार सुनिल शेळकेंनी मावळ तालुक्यासाठी खेचून आणला भरघोस निधी । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Raigad News Lost mobile phone recovered Khopoli police efforts successful joy on faces of 40 citizens

Khopoli News : हरवलेले मोबाईल पुन्हा हातात ; खोपोली पोलिसांच्या प्रयत्नांना यश, ४० नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद

May 25, 2026
Fort conservation campaign completed at Tikona Fort in Pawan Maval area

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे, सह्याद्री आणि मी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने मावळातील तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन मोहीम

May 25, 2026
Pavana-Dam

Pawana Dam Update । पवना धरणात २७ टक्के पाणीसाठा ; ‘या’ तारखेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

May 25, 2026
Maval Taluka Congress party demands strict action against culprits in NEET paper leak case

नीट (NEET) पेपर लीक प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाची मागणी

May 25, 2026
Forced sale of non-subsidized fertilizers along with subsidized fertilizers stopped Agriculture Minister Dattatreya Bharane

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद

May 25, 2026
Concrete decisions to accelerate Lonavala Sky Walk project joint meeting of MLA Sunil Shelke District Collector PMRDA Commissioner

आमदार शेळके, जिल्हाधिकारी आणि PMRDA आयुक्त यांच्या संयुक्त बैठकीत लोणावळा स्काय वॉक प्रकल्पाला गती देण्यासाठी ठोस निर्णय

May 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.