व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी

काँग्रेसने पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत पाहायला मिळेल.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 21, 2024
in देश-विदेश, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
Congress-Lok-Sabha-Candidates

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक 2024 च्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून (Congress) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. काँग्रेसने देशातील एकूण 57 जागांवरील उमेदवार आपल्या तिसऱ्या यादीत जाहीर केलेत. त्यात महाराष्ट्रातील 7 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. नंदूरबार, अमरावती, नांदेड, पुणे, लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या 7 जागांवरील उमेदवार काँग्रेसमे घोषित केलेत. कोल्हापूर येथून शाहू महाराज छत्रपती यांना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी दिली गेली आहे तर, पुण्यातून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे. म्हणजेच पुण्यात रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत पाहायला मिळेल. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

काँग्रेसचे 7 उमेदवार जाहीर –
काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे लोकसभेसाठी आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नंदुरबार येथून गोवळ पडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमरावती लोकसभेसाठी बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, सोलापूर येथे अपेक्षेप्रमाणे प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ( Congress Releases Third List of Lok Sabha Poll Candidates Including 7 Constituencies In Maharashtra )

कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित ‘केंद्रीय चुनाव समिति’ की बैठक में लोकसभा चुनाव, 2024 के लिए 57 लोकसभा सीटों पर कांग्रेस उम्मीदवारों के नाम की तीसरी लिस्ट जारी की गई। pic.twitter.com/7TMkx4faZ4

— Congress (@INCIndia) March 21, 2024

राज्यात एकीकडे भाजपाकडून उमेदवारांच्या नावाची एकामागे एक घोषणा होत आहे. दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून राज्यातील एकाही उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नव्हते. आता मात्र पहिल्या सात उमेदवारांची घोषणा झालीये. देशात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे. देशात एकूण सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. दिनांक 19 एप्रिल ते 1 जून पर्यंत सात टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होईल. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर अंतिम निकाल4 जून रोजी लागणार आहे.

अधिक वाचा –
– दैनिक मावळ ‘संवाद’ : अडथळ्यांच्या वाटेवरील प्रेरणादायी प्रवास, मराठीतील युवा दिग्दर्शक ‘हृदयमानव’ याच्यासोबत खास बातचीत
– जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 150 पक्षीप्रेमींना चिमण्यांच्या कृत्रिम घरट्यांचे वाटप । Vadgaon Maval
– मावळ राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त हरणेश्वर टेकडी येथे वृक्षारोपण । Talegaon Dabhade


Previous Post

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED

Next Post

अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Prasad-Ingulkar-Maval-Pune

अभिमानास्पद! तुंगार्ली गावातील प्रसाद इंगुळकर याची ग्राम महसूल अधिकारीपदी निवड, गावकऱ्यांनी काढली जंगी मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.