व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी श्रीरंग बारणे यांचा विजय महत्वाचा’ – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी बावनकुळे बोलत होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 8, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Maval-Loksabha-BJP-Shrirang-Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय भाजपासाठी महत्वाचा आहे, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी बावनकुळे बोलत होते. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

व्यासपीठावर शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार अश्विनी जगताप, प्रशांत ठाकूर, उमा खापरे, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप तसेच शरद बुट्टे पाटील, अविनाश कोळी, विक्रांत पाटील, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर देखील उपस्थित होते. ( Maval Lok Sabha BJP Functionaries Meeting In Pune Chandrasekhar Bawankule Shrirang Barane Present )

  • मावळ लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला मिळावा, अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. महायुतीच्या जागा वाटपात मावळची जागा शिवसेनेकडेच कायम राहिल्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी होती. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका समजावून सांगितली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आणि शिवसेनेची युती खूप जुनी आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळे सर्वाधिक आमदार असूनही आपल्याला अडीच वर्षे विरोधात बसावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे धाडस व त्याग केल्यामुळे आपण महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत आलो, हे कदाचित विसरून चालणार नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्याचे पालन करीत आपण सर्व मित्र पक्षांना एकत्र घेऊन काम करणे आवश्यक आहे.

मावळ लोकसभेचीच काय तर रामटेकची जागा देखील महायुतीत शिवसेनेला सोडली आहे. नरेंद्र मोदी यांनी ‘अब की बार चार सौ पार’ हे लक्ष्य निर्धारित केले आहे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही किंतू-परंतु मनात न ठेवता झोकून देऊन काम केले पाहिजे. मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मावळात धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे खरोखर जाऊन मतदारांना सांगा व खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून आणा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.

अधिक वाचा –
– लोणावळ्यात रात्री अपरात्री गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर कारवाई; अश्लील हावभाव करून नाच करणाऱ्या नर्तिकांसह 10 जणांवर गुन्हे दाखल
– भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त मावळ तालुक्यात पक्षाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचा सन्मान । BJP Foundation Day
– देशभरातील पालकांसाठी महत्वाची बातमी! जन्म नोंदणी प्रक्रियेत मोठा बदल, बाळाच्या जन्म दाखल्यावेळी ‘ही’ माहिती द्यावी लागणार


dainik maval jahirat

Previous Post

मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

Next Post

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dolasnath-Maharaj-Talegaon-Dabhade

तळेगाव दाभाडे शहराचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज सार्वत्रिक उत्सव 2024 निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.