व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, August 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सचिन आहिर यांच्या उपस्थितीत तळेगाव दाभाडे येथे मविआची महत्वाची बैठक । Maval Lok Sabha

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मावळ मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 22, 2024
in ग्रामीण, लोकल, शहर
Shivsena mla Sachin Ahir

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मावळ मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी तळेगाव दाभाडे येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत इंडिया आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. माजी मंत्री शिवसेना उपनेते (ठाकरे गट) आमदार सचिन आहिर यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान तळेगाव येथे मविआच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशाल वाळुंज यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आमदार अहिर यांनी अगोदर तळेगाव परिसरात माजी आमदार कृष्णराव भेगडे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, युवा काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाळुंज, अल्प संख्यांक सेलचे माजी अध्यक्ष आयुब शिकीलकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. तसेच तालुक्यातील विविध विषयांसह राजकीय वातावरणाबाबत माहिती घेतली. यावेळी शैला खंडागळे, केसरीनाथ पाटील, भारत ठाकूर, आशिष ठोंबरे, भूषण जगताप, मारुती खोळे, शांताराम भोते, युवराज सुतार, अनिकेत घुले, उमेश जावडे, संगीता सोनावणे, रुपाली अहिर, शांताराम तांबोळी, सतीश शेलार, रुद्रशीव भोसले आदीजण उपस्थित होते. ( Mahavikas Aghadi Meeting at Talegaon Dabhade In presence of mla Sachin Ahir Maval Lok Sabha )

काँग्रेसचे युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांच्या निवास्थानी आहिर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी तळेगाव शहरातील संरक्षण खात्याच्या वतीने संपादित जागेच्या प्रलंबित प्रश्नावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच एमआयडीसी मधील फॉक्सकॉन कंपनी गेल्यानंतर लोकप्रतिनिधींनी बाळगलेले मौन, मिसाईल प्रकल्पाचा गेल्या 20 वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न, आजी-माजी खासदार-आमदार यांची विविध प्रश्नांवर बघ्याची भूमिका याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या वतीने मावळ लोकसभेचा (उमेदवार संजोग वाघेरे) जोरदार प्रचार सुरू..
स्वाभिमानाच्या लढाईत निष्ठावान जिंकणार..! pic.twitter.com/MV2n0IqMcy

— Sachin Ahir (@AhirsachinAhir) April 20, 2024

अधिक वाचा –
– अभिनंदन! सह्याद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक सचिन शेडगे यांना मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते ‘वीर कोयाजीराव बांदल पुरस्कार’
– ‘वंचित’च्या एन्ट्रीमुळे मावळ लोकसभेत होणार ‘तिरंगी’ लढत, मतविभाजनाचा फायदा नेमका कोणाला? । Maval Lok Sabha
– भगवान महावीर जन्म कल्याणक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे येथे भव्य रक्तदान शिबिर । Talegaon Dabhade


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या उपस्थितीत श्रीरंग बारणेंकडून मावळ लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल । Maval Lok Sabha

Next Post

तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Swami Samarth copper idol Talegaon

तळेगावमधील स्वामी समर्थ मंदिरात 1131 किलो तांब्याच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.