दिनांक 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने बुधवारी (दि. 5) तब्बल दोनशे झाडांची लागवड करण्यात आली. तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत स्वच्छता मोहिम देखील राबवण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तळेगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव स्टेशन येथील तळे, पुणे-मुंबई महामार्गालगत पालिकेकडून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, विशाल मिंड, विजय शहाणे, सिद्धेश्वर महाजन, व॑रिंद्र नारगुंडे, मनिषा चव्हाण, प्रमोद फुले, तुकाराम मोरमारे, विभा वाणी आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ( World Environment Day 5 June Tree plantation through Talegaon Dabhade Nagar Parishad )
“पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो. या अनुषंगाने आपण सर्वांनी पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समोल राखावा.” – श्री. एन. के. पाटील (मुख्याधिकारी, तळेगाव नगरपरिषद)
अधिक वाचा –
– “मतदारांचा कौल मान्य, निवडणूकीत जय-पराजय होतात, पण..”, मावळ लोकसभेतील पराभवानंतर संजोग वाघेरेंची प्रतिक्रिया, वाचा
– ‘दहा वर्षांपासून मी मावळसाठी झटत आहे.. हा विकासाचा आणि विश्वासाचा विजय’, वाचा ऐतिहासिक विजयानंतर बारणेंची पहिली प्रतिक्रिया
– वसुंधरेला समृद्ध करण्याचा वसा घेतलेले रघुनाथ ढोले ! जागतिक पर्यावरण दिन निमित्त वाचा विशेष लेख । World Environment Day