व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 7, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Maharashtra Pawar Family Four Generations In Politics

Photo Courtesy : Team Dainik Maval


Pawar Family Defeat In Election : लोकसभा निवडणूक 2024 चे अंतिम निकाल जाहीर झाले आहेत. यंदाची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी अत्यंत खास राहिली. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या फुटीनंतरची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. त्यामुळे या निवडणूकीला अनन्यसाधारण महत्व होते. यासह राज्यातील अनेक लढती या देशापातळीवर चर्चेच्या ठरल्या होत्या. त्यातील प्रमुख लढत होती, ती म्हणजे पवार कुटुंबातील ननंद – भावजय यांच्यातील. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत शरद पवार यांची लेक सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आमनेसामने होत्या. राष्ट्रवादीतील फुटीनंतरची ही निवडणूक आणि त्यातही थेट पवार कुटुंबात लढत होत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. निकाल काहीही लागो, पण पराभव पवार कुटुंबाचाच होणार, हे सर्वांनाच माहिती होते. आणि झाले अगदी तसेच. या निवडणूकीच्या निमित्ताने पवार कुटुंबाने आणखीन एक पराभव पाहिला. पवार कुटुंबातील हा तिसरा पराभव होता. या लेखात आपण हे तिनही पराभव पाहणार आहे. ( Lok Sabha 2024 Result Maharashtra Pawar Family Four Generations In Politics Three Defeat )

वसंतराव पवार –
पवार कुटुंब म्हटलं की शरद पवारांचे नाव सर्वांत आधी येते. 1967 पासून संसदीय राजकारणात असलेले शरद पवार ह्यांनी स्वतः कधीही पराभव पाहिलेला नाही. परंतू त्यांच्या कुटुंबातील तिघांनी आजवर पराभव पाहिला आहे. त्यातील पहिलं नाव आहे ते वसंतराव पवार. वसंतराव पवार हे शरद पवार यांचे थोरले बंधू, ते शेतकरी कामगार पक्षात काम करत होते. तर शरद पवार काँग्रेसचे कार्यकर्ते होते. 1958 साली तत्कालीन पोटनिवडणूकीत वसंतराव पवार यांच्याविरुद्ध गुलाबराव जेधे खासदारकीच्या निवडणूकीत उभे होते. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेस कार्यकर्ता म्हणून गुलाबराव जेधेंचा प्रचार केला आणि त्यावेळी वसंतराव पवार यांचा पराभव झाला. पवार कुटुंबाने पाहिलेला हा पहिला पराभव.

पार्थ पवार –
पवार कुटुंबाने त्यानंतरचा पराभव पाहिला तो थेट 2019 साली. अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. अजित पवारांचा पाठींबा आणि कार्यकर्त्यांचे बळ यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक सोपी वाटत होती. तर पवारांच्या नव्या पिढीतील पार्थ हे पहिलेच होते. त्यामुळे अजितदादांनी जिवाचे रान केले. मात्र श्रीरंग बारणे यांना शिवसेना पक्षा सोबतच भाजपा आणि मित्रपक्षांची चांगली साथ मिळाली आणि पार्थ पवार पराभूत झाले. लेकाचा पराभव हा अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. पवार कुटुंबाचा हा दुसरा पराभव होता.

सुनेत्रा पवार –
सुनेत्रा पवार यांच्या रुपाने आता पवार कुटुंबाने तिसरा पराभव पाहिला आहे. गतवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडली. अजित पवार यांच्या सोबत एक मोठा आमदारांचा गट बाजूला झाला. आणि शरद पवार हे त्यांच्या समर्थक आमदार – खासदार सह वेगळे झाले. यात पुढे पक्षाचे नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळाले. ह्या राजकीय घडामोडीत लोकसभा निवडणूका जाहीर झाल्या आणि अनपेक्षितरित्या बारामतीत सुनेत्रा पवार व सुप्रिया सुळे एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. ननंद – भावजय यांच्यातील या लढतीत अखेर सुप्रिया सुळे यांनीच बाजी मारली. परंतू सोबतच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. हा पवार घराण्यातील तिसरा पराभव ठरलाय.

अधिक वाचा –
– संजोग वाघेरे यांच्या पराभवाची प्रमुख 5 कारणे, नक्की वाचा । Maval Lok Sabha 2024
– महाराष्ट्रात महाविकासआघाडीला घवघवीत यश ! वडगाव मावळ येथे मविआ कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा । Vadgaon Maval
– श्रीरंग बारणेंच्या विजयानंतर मावळात भाजपाचा जल्लोष ! वडगाव आणि तळेगाव शहरात फटाके फोडून मिठाईचे केले वाटप । Maval News


Previous Post

पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव

Next Post

लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
IPS Satyasai Karthik team took action

लोणावळा शहरात गुटखा विक्री करणाऱ्या पानटपरी मालकांचे धाबे दणाणले ! IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची मोठी कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
Vadgaon-Maval-Historical-Pond

वडगावमधील ऐतिहासिक तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करावे ; श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानची मागणी

March 2, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव नगरपरिषदेचा डिजिटल कारभार ; आता मालमत्ताकर भरण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही

March 2, 2026
Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.