व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदारकीची हॅटट्रीक करून दिल्ली गाठताच मावळचे खासदार श्रीरंग बारणेंवर शिवसेना पक्षाकडून मोठी जबाबदारी !

लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आणि मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग आप्पा बारणे यांनी इतिहास घडवला. सलग तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारणे दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेलेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2024
in ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, लोकल, शहर
Shrirang Barne Appointed As Pratod

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूकांचा निकाल जाहीर झाला आणि मावळ लोकसभा मतदारसंघात श्रीरंग आप्पा बारणे यांनी इतिहास घडवला. सलग तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाकडून धनुष्यबाणाच्या चिन्हावर बारणे दिल्लीत खासदार म्हणून निवडून गेलेत. आज (दि. 7 जून) दिल्लीत एनडीए आघाडीच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होती. या बैठकीला शिवसेना पक्षाचे सर्व खासदार आणि पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे उपस्थित होते. एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर संसदेतील शिवसेना पक्ष कार्यालयात शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक संपन्न झाली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या संसदीय दलाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली. तर मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्यावर शिवसेना पक्षाचे संसदेतील प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली. देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यात शिवसेना पक्षालाही वाटा मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट तर दोन राज्यमंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. या मंत्रिपदातही श्रीकांत शिंदे आणि श्रीरंग बारणे यांचे नाव आघाडीवर आहे.

अशी झाली निवड –
गटनेता निवडीसाठी शिवसेना संसदीय समितीची बैठक संसद भवनातील शिवसेना पक्ष कार्यालयात पार पडली. यावेळी श्रीरंग बारणे यांनी गटनेता निवडीसाठी श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर बैठकीला उपस्थित सर्व शिवसेना खासदारांनी एकमताने श्रीकांत शिंदे यांची गटनेता म्हणून निवड केली. त्यानंतर श्रीरंग बारणे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचा लोकसभेतील गटनेता निवडण्याची ही प्रक्रिया शिवसेना पक्षांतर्गत करण्यात आली आहे. लोकसभा सभापतींची निवड झाल्यानंतरच अधिकृतपणे शिवसेना लोकसभा गटनेतेपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.

लोकसभा निवडणूकीत शिंदेंच्या शिवसेनेला चांगले यश –
लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने 15 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 7 जागांवर शिंदे गटाचे खासदार निवडून आले आहेत. यात बुलढाणा, औरंगाबाद, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम मावळ आणि हातकलंगले या मतदारसंघांचा समावेश आहे. निवडून आलेल्या खासदारांमध्ये एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांनी आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी खासदारकीची हॅटट्रीक केली आहे. आता या दोघांवरही पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

अधिक वाचा –
– पवार कुटुंबाचा आजवर तीन वेळा पराभव, प्रत्येक पिढीने पाहिलाय एक पराभव, पाहा नावे । Pawar Family Defeat In Election
– पावसाळा सुरु होतोय ! नागरिकांनो आपले घर आणि परिसर ठेवा स्वच्छ; हिवताप – डेंग्यू सारख्या आजारांपासून करा बचाव
– मुंबईत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक ! आमदार सुनिल आण्णांसह 5 जणांची दांडी, चर्चांना उधाण, अजितदादा म्हणाले…


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! नरेंद्र मोदी यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, एनडीएच्या नेतेपदी एकमुखी निवड, ‘या’ दिवशी होणार शपथविधी

Next Post

कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
raided gambling den

कान्हे फाटा रेल्वे स्टेशनजवळील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ! 7 जणांवर गुन्हा दाखल, हजारोंचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

As per directions of Minister Shivendrasinhraje Bhosale repair of Talegaon-Chakan-Shikrapur road accelerated

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्देशानुसार तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या दुरुस्तीला वेग

September 1, 2026
Draft electoral rolls for 21 Assembly constituencies in Pune district published

Pune News : पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

September 1, 2026
senior Warkaris from Maval honored with Akhand Wari Jeevan Gaurav Puraskar by Kamshet Journalists Association

मावळातील १५ ज्येष्ठ वारकऱ्यांचा ‘अखंड वारी जीवन गौरव पुरस्काराने’ गौरव ; कामशेत ग्रामीण पत्रकार संघाचा उपक्रम

September 1, 2026
Crime

नवलाख उंब्रे जवळ गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक ; तब्बल १.२६ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 1, 2026
Balasaheb Ghotkule announced as recipient of Major Dhyan Chand Maharashtra Krida Ratna Award 2026

बाळासाहेब घोटकुले यांना ‘मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडारत्न पुरस्कार २०२६’ जाहीर

September 1, 2026
Inauguration of new Zilla Parishad Primary School building at Ovale Maval Taluka

ओवळे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

September 1, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.