संपूर्ण देशाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. भारताच्या जम्मू आणि काश्मीर भागातील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी रविवारी (दि. 9 जून) वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. अंदाधुंद हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून 10 जण ठार झाल्याची माहिती मिळत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत असताना दुसरीडकडे काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
जम्मू आणि काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून आतापर्यंत 10 जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिव खोरी मंदिर येथून हे यात्रेकरू कटऱ्याला जात होते. घटनेत अनेकजण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. महत्वाचे म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेत असताना दुसरीकडे ही भयंकर घटना घडली आहे. ( 10 people lost their lives and several were injured in terror attack Jammu and Kashmir )
प्राप्त माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास भाविकांच्या बसवर गोळीबार झाला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 10 मृतदेह हाती लागले आहेत. तर जखमींना नजिकच्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जम्मूमधील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांत अलिकडे दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाल्याची नोंद आहे.
अधिक वाचा –
– मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी
– तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade
– सोमाटणे, वरसोली टोलनाक्याचा प्रश्न तात्पुरता निकाली ! स्थानिकांची संपूर्ण टोलमाफी, वाचा काय म्हणाले आमदार सुनिल शेळके