मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक येथील दत्तवाडी रस्त्यावरील नवीन पुलाचे लोकार्पण सोमवारी (दि. 10 जून) करण्यात आले. कुसगाव बु. गावातील वार्ड क्र.6 मधील दत्तवाडी ते कुसगाव रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत तब्बल 96 लक्ष 33 हजारांचा निधी उपलब्ध झाला होता. आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत सोमवारी या पुलाचे लोकार्पण करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
तसेच यावेळी कुसगाव बु. गावातील अंतर्गत रस्त्यांचे आणि विविध विकासकामांचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी कुसगाव बु, ओळकाईवाडी, डोंगरगाव, डोंगरगाव वाडी, केवरे, औढे, औंढोली येथील नागरिकांसोबत आमदार शेळकेंनी संवाद साधला. तसेच स्थानिकांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करुन त्याचे निरासन करत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ( new bridge Inauguration by mla sunil shelke at kusgaon budruk village )
यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे, माजी जिल्हापरिषद सदस्या गंगाताई कोकरे, माजी पंचायत समिती सदस्य दिपक हुलावळे, हरिष कोकरे, सदस्या राजश्री राऊत, सरपंच अश्विनी गुंड, उपसरपंच सुरज केदारी, माजी उपसरपंच अनंता घुले, नामदेव डफळ, नितीन साळवे, मुरलीधर लोहर, गोविंद कोकरे, संतोष राऊत, ज्ञानेश्वर गुंड आदी मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या खासदारांची पक्षनिहाय यादी, एनडीए सरकारमध्ये कुठल्या पक्षाचे किती मंत्री ? एका क्लिकवर पाहा लिस्ट
– मोदी 3.O पर्वाची सुरुवात ! नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, एकूण 72 खासदार शपथबद्ध, पाहा संपूर्ण यादी
– तळेगाव येथे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करियर मार्गदर्शन चर्चासत्र । Talegaon Dabhade