Dainik Maval News : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुंडाविरोधी पथकाने केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत चार पिस्तूल आणि 12 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. तळेगाव दाभाडे येथील गोळीबार प्रकरणी फरार असलेल्या दोघांना मुंबई येथून अटक करण्यात आली. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी परिसरात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
दोन्ही कारवाईमध्ये एकूण चार पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. तळेगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी विकी खराडे आणि पांडुरंग उर्फ पांडा बालाजी कांबळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सांगवीमधून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी रोहित दर्गेश धर्माधिकारी आणि अनिकेत सतीश काजवे याला अटक करण्यात आली आहे.
तळेगावमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात तिघांना आधीच अटक करण्यात आली आहे. तर दोघेजण फरार होते. त्यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली. मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण द्वारे पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये धर्माधिकारी आणि काजवे दोघे अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळालेली होती. त्यांना सापळा रचून अटक करण्यात आली.
त्यांच्याकडे दोन पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे मिळाली आहेत. तर तिसऱ्या कारवाईमध्ये पाच वर्षांपासून हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तुषार उर्फ गोल्या रामराव राठोड असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला चाकणमधून अटक करण्यात आली. ( Talegaon Dabhade Firing Case Two accused arrested from Navi Mumbai )
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 : ‘या’ शेतकऱ्यांना वर्षभर मिळणार मोफत वीज, वाचा सविस्तर
– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला उदंड प्रतिसाद ; महिन्याभरात 1 कोटी महिलांकडून ऑनलाईन अर्ज दाखल
– आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, वारसांना 50 लाख मिळावेत ; तिहेरी हत्याकांडातील मृत महिलेच्या वारसांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट