व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 14, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर, शहर
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलै पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही, अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करिता राज्यात आतापर्यंत 1 कोटी 56 लाख 61 हजार 209 महिलांनी केली नाव नोंदणी. त्यापैकी 1 कोटी 35 लाख 22 हजार 579 अर्ज पात्र आहे. तसेच अद्यापही अर्ज न केलेल्या माता-भगिनींनी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 17 ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लाभ वितरण कार्यक्रम घेण्यात यावेत, ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यादव, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आदी यावेळी उपस्थित होते.

  • तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम येत्या 17 ऑगस्ट रोजी पुण्यात होणार आहे. त्याचवेळी प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात यावेत. जेथे पालकमंत्री उपलब्ध नसतील त्या जिल्ह्यात खासदार/आमदार यांच्या उपस्थितीत त्याचवेळी लाभ वितरणाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात यावा. त्या ठिकाणी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात यावे.

या योजनेत आतापर्यंत 1 कोटी 35 लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डिबिटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27 लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहिम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्ट़ पर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. दिनांक ३१ ऑगस्ट़ नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यानाही या योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.

बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ –
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही, अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहनही तटकरे यांनी यावेळी केले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिकस्तरावर अधिकारही देण्यात आले आहेत. यासंबंधी क्षेत्रिय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे. या ॲप्लिकेशनमध्ये वॉर्डस्तरीय, विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे, असे यादव यांनी यावेळी सांगितले.

अधिक वाचा –
– नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

– खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ! पराभूत उमेदवाराकडून न्यायालयात याचिका दाखल, पुन्हा एकदा… । Maval Lok Sabha MP Shrirang Barne
– तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक


Previous Post

पीएम-किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 1 हजार 698 कोटी 70 लाख रुपये जमा

Next Post

हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat

हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे 'तिरंगा दौड' मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
Police take strong action against bullet kings in Vadgaon Maval city

वाहतूकीचे नियम मोडणारे, गाडीला काळ्या काचा – फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहन चालकांवर वडगाव मावळ पोलिसांची कारवाई

March 5, 2026
Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.