Dainik Maval News : मावळ तालुक्यातील देवले या छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुंटुबातील वैभव रोहिदास आंबेकर या युवकाची एकाच आठवड्यात एसआरपीएफ आणि पिंपरी चिंचवड पोलीस दलात निवड झाली आहे. एकाच आठवड्यात दोन ठिकाणी निवड झाल्याने वैभव आंबेकर याच्या कुटुंबाला आनंदाचा डबल डोस मिळाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील देवले गावातील शेतकरी कुंटुब रोहिदास आंबेकर आणि त्याचे चुलते माजी सरपंच महेंद्र आंबेकर हे संपूर्ण कुंटुब कार्ला परिसरातील प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यवसायिक कुटुंब म्हणून ओळखले जाते. शेतात वडिलांना मदत करत वैभवने त्याचे मार्गदशक अनिकेत उडाफे यांंच्या तळेगाव येथील यशस्वी करियर अकादमीत प्रवेश घेऊन पोलिस भरती परीक्षा देऊ लागला. ( Vaibhav Ambekar from Devale village in Maval taluka Selected in Pimpri Chinchwad Police Force )
आता त्याची एसआरपीएफ गट नंबर २ आणि पिंपरी चिंचवड पोलीस भरती अशा दोन परीक्षांमध्ये यश मिळाले आहे. आठ दिवसापूर्वी आरपीएफ मध्ये त्याची निवड झाली होती, तर पंधरा ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भरती निकालात तो उत्तीर्ण झाला आहे. सध्या वैभववर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच असे दुहेरी यश मिळविणारा वैभव देवले हा देवले गावासह पंचक्रोशीतील पहिलाच युवक ठरला आहे.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील पहिल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News
– महत्वाचे ! वस्तू खरेदी करताना मोबाईल नंबर देणे बंधनकारक नाही, समजून घ्या नियम
– पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई ! घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील मुख्य आरोपीला अटक, 12 लाखांचा मुद्देमाल जप्त