Dainik Maval News : ‘शादी डॉट कॉम’ या लग्न जुळविणाऱ्या साइटवर झालेल्या ओळखीतून लोणावळा शहरात फिरायला आलेल्या एका घटस्फोटित महिलेला आणि तिच्या कुटुंबातील लोकांना 3 लाख 95 हजाराचा गंडा लावून एक ठग फरार झाल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मिळालेल्या माहितीनुसार लुधियाना, पंजाब येथे राहणाऱ्या एका महिलेचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. एक महिन्यापूर्वीच या महिलेचा आणि आरोपी असलेल्या मोहीत चड्डा (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांची शादी डॉट कॉम वरती ओळख झाली होती. मागील महिन्यात 17 जुलै रोजी मुंबई येथे त्यांच्यात लग्नाची बोलणी झाली. त्यानंतर सदर महिला आणि तिच्या कुटुंबातील इतर आठ जण मोहीत चड्डा सोबत फिरण्यासाठी म्हणून 11 ऑगस्ट रोजी लोणावळा येथे आले.
याठिकाणी मोहित चड्डा याने सर्वांना राहण्यासाठी एक बंगला बुक केला. दुसऱ्या दिवशी 12ऑगस्ट रोजी मोहीत याने या बंगल्यात दुपारी 03:30 वाजण्याच्या सुमारास सर्वांना मँगो ज्यूस पिण्यासाठी दिला आणि त्यानंतर जेवून ते झोपी गेले. दुसऱ्या दिवशी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वा. सर्वांना जाग आल्यावर त्यांना समजलं की, त्यांच्याकडील 1 लाख 95 हजार रुपये किमतीचे 6 वेगवेगळे मोबाईल व बॅगेत असलेली 2 लाख रुपये रोख असे एकूण 3 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास मरून मोहीत चड्डा हा रफुचक्कर झाला होता.
सर्व प्रकार लक्षात आल्यावर फिर्यादी महिलेसह सर्व कुटुंबाने लोणावळा पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी मोहीत चड्डा याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम 305 (अ) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस निरीक्षण सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. संदीप मानकर हे करीत आहे. ( 3 lakh 95 thousand looted from woman who came to Lonavala through acquaintance made on Shaadi Dot com )
अधिक वाचा –
– साते गावातील सद्गुरू आगळमे याची पिंपरी-चिंचवड पोलीस दलात निवड, गावकऱ्यांनी खांद्यावर घेऊन काढली मिरवणूक । Maval News
– स्तुत्य उपक्रम ! ऑफबीट फाउंडेशन तर्फे भाजे येथील संपर्क बालग्राम मधील मुलींसाठी आवश्यक साधनसामग्रीची भेट
– मावळ तालुक्यातील पहिल्या दुर्गसंवर्धन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद । Maval News