Dainik Maval News : लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकास कामांचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. लोणावळा नगरपरिषद हद्दीतील मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधणे, अंगणवाडी केंद्र बांधणे आणि समाज मंदिर बांधणे या कामांचा शुभारंभ आमदार शेळके आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर कामांसाठी सुमारे 1 कोटी 40 लक्ष निधी उपलब्ध झाला असून मुस्लिम बांधवांकडून अनेक वर्षांंपासून या कामांची मागणी होत होती. अखेर या कामांना आज प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.
यावेळी लोणावळा नगरपरिषद मुख्याधिकारी अशोक साबळे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, श्रीधर पुजारी, आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेना नेते मच्छिंद्र खराडे, राष्ट्रवादी काँग्रेस लोणावळा अध्यक्ष विलास बडेकर, प्रमोद गायकवाड, निखिल कवीश्वर, आरोही तळेगावकर, उमाताई मेहता, बाबा मुलाणी, हनिफभाई शेख, झिशान शेख, फरहान शेख, शफी आत्तार रफिकभाई शेख, मुश्ताक काठेवाडी, लतीफ खान, ॲड. अश्फाक काझी, आशिष बुटाला, जाकीर खलिफा, संजय घोणे, समीर खोले, जयेश देसाई आजी-माजी पदाधिकारी, तसेच सुन्नी मुस्लिम जमात अमलगमेटड ट्रस्ट लोणावळा सर्व पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.
अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval
– कुंडमळा येथे वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृतदेह सापडला । Talegaon Dabhade
– ‘मी मावळ विधानसभेसाठी इच्छुक… कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार’ : बापूसाहेब भेगडे