व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिळींब ग्रामपंचायतच्या सदस्याचे ग्रामसेवकावर गंभीर आरोप; सहकार्य करत नसल्याची तक्रार, ग्रामस्थांचाही समान सूर

मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील मौजे शिळींब ( Shililmb Village ) ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 16, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल
Shililmb-Village-Maval

Photo : Vishal Kumbhar


मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) पवनमावळ ( Pavan Maval ) भागातील मौजे शिळींब ( Shililmb Village ) ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. गावातील ग्रामस्थ, तरुणांनी यापूर्वीही ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याची, माहिती देत नसल्याची तक्रार अनेकदा केली होती. त्यानंतर आता थेट ग्रामपंचायत सदस्य लिलाधर धनवे यांनीच ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याचे म्हणत त्यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. लिलाधर धनवे यांनी दैनिक मावळशी संवाद साधताना याबद्दल भाष्य केले आहे. ( Pavan Maval Shilimb Village Gram Panchayat Member Alleges Against Gram Sevak )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय आहे ग्राम सदस्याची तक्रार?

ग्रामपंचायत सदस्य लिलाधर धनवे यांनी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संतोष बोंद्रे यांच्यावर काही आरोप केले आहेत. ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागितलेली माहिती देखील देण्यास ते टाळाटाळ करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ग्रामसभा, मासिक सभेचे लिहिलेले प्रोसिडिंग मागितले असता, आज महिने गेले तरीही त्यांनी ते अद्याप दिले नसल्याचे धनवे यांनी म्हटले आहे. तसेच, ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याची शंकाही ग्रामसदस्य लिलाधर धनवे यांनी ग्रामसेवक संतोष बोंद्रे यांच्याबद्दल बोलून दाखवली.

ग्रामस्थांचाही समान सूर…

ग्रामसेवक संतोष बोंद्रे हे गावातील नागरिकांना आवश्यक ती माहिती देत नाहीत, सहकार्य करत नाहीत, अशी तक्रार स्वतः लिलाधर धनवे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ आणि तरुणांनी केली आहे. इतकेच नाही तर मावळ तालुक्यातील एक मोठी ग्रामपंचायत असलेल्या शिळींब ग्रामपंचायतचा कारभार आणि गावचा विकास अशा बेशिस्त आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे खुंटला असल्याचेही दिसत आहे. हे सर्व समजून घ्यायला मागील कित्येक महिने गावात ग्रामसभाही झालेली नाही, असे काही नागरिकांनी दैनिक मावळ सोबत बोलताना सांगितले.

अधिक वाचा –
– मोठी बातमी! शिळींब गावात महिन्याभरात दुसरी मोठी चोरी, लाखोंचा माल लंपास, ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण I Video
– पीएमपीएमएल बस शिळींब गावापर्यंत येणार? विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय टळणार? महाव्यवस्थापकांना ग्रामस्थांचे निवेदन
– शिळींब ग्रामपंचायतीला गांधी जयंतीचा विसर; गावातील तरुणांनी बंद कार्यालयासमोर साजरी केली गांधी जयंती, तालुक्यात होतेय चर्चा


dainik maval jahirat

Previous Post

वारू गावातील काकडा आरती सोहळ्याची सांगता, ह.भ.प. संदिप महाराज लोहोर यांनी केले काल्याचे कीर्तन

Next Post

सुमा शिरूर यांच्या रुपाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय पुरस्काराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सन्मान

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dronacharya-Award-To-Suma-Shirur

सुमा शिरूर यांच्या रुपाने रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय पुरस्काराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.