Dainik Maval News : तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमाटणे फाटा येथून सुमारे अडीच लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.15) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अश्फाकअली सज्जादअली शेख (वय 40, रा. गोवंडी वेस्ट) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार उमाकांत नवगिरे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमाटणे फाट्याकडून मुंबई पुणे द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आदित्य हॉटेल समोर एक जण गांजा घेऊन आल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्फाकअली शेख याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे अडीच लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करत अश्फाकअली याला अटक केली. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तळेगाव येथील होम मिनिस्टर स्पर्धेत गौरी दरेकर ठरल्या महाविजेत्या ; सत्तर वयापर्यंतच्या महिलांनी घेतला सहभाग । Talegaon Dabhade
– वडेश्वर शाळेतील आदर्श शिक्षिका वनिता राजपूत यांचा खास सन्मान । Vadgaon Maval
– किल्ले कोरीगड येथे दुर्गपुजन आणि स्वच्छता मोहीम संपन्न, सह्याद्री प्रतिष्ठानचा उपक्रम