व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”

शिवरायांचा अपमान कदापी सहन करणार नाही, भाजपाने माफी मागावी, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 20, 2022
in महाराष्ट्र, व्हिडिओ
bhagat-singh-koshyari

File Photo : bhagat singh koshyari


भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतीबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. छत्रपतींची तुलना भाजपाच्या नितीन गडकरींशी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, अशा वादग्रस्त राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच शिवाजी महाराजांबद्दल भाजपाच्या प्रवक्तेन्या अकलेचे तारे तोडले आहेत त्याबद्दल भाजपाने जाहीर माफी मागावी अन्यथा भाजपाच्या नेत्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ( Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari Derogatory statement about Chhatrapati Shivaji Maharaj )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

जळगाव जामोद येथे पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी राज्यपाल कोश्यारी व भाजपा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदीचा खरपूस समाचार घेतला. महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक बोलताना राज्यपाल कोश्यारींची जीभ कशी झडली नाही? त्यांच्या अशा विधानातून आरएसएसची मानसिकता दिसून येते. महाराष्ट्रातच महाराष्ट्राच्या दैवतांचा धडधडीत अपमान करण्याची हिम्मत होतेच कशी? निवडणुकीत नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस छत्रपतींच्या नावाने मतं मागतात आणि सत्तेत बसून वारंवार त्यांचाच अपमान करता, ही सत्तेची गुर्मी आहे, राज्यातील हा कचरा आता साफ करण्याची वेळ आहे, असे ते म्हणाले.

सावरकरांचा माफीनामा जिरवायला शिवछत्रपतींची बदनामी करणारे महाराष्ट्राच्या नाहीत तर खुज्या विचारांच्या अवलादी आहेत.

औरंगजेबाचे त्याच्या दरबारात वाभाडे काढणाऱ्या शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र आहे हे भाजपने लक्षात ठेवावं आणि जाहीर माफी मागावी अन्यथा परिणाम भोगायला तयार राहावे!

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 19, 2022

हेही वाचा – लोणावळ्यात राहुल गांधींविरोधात भाजपाचे आंदोलन, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यालाही अभिषेक

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश यावेळी म्हणाले की, भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला असून या पदयात्रेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवी उर्जा, नवा उत्साह, नवा जोश निर्माण झाला असून काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आगामी काळात चांगली कामगिरी करेल व काँग्रेस पक्षाचे नवे रुप यापुढे दिसेल. भाजपाला जनता कंटाळली असून त्यांना पर्याय हवा आहे आणि काँग्रेसच योग्य पर्याय आहे याची जनतेला खात्री आहे. या पदयात्रेत महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहभागी झाले, त्यांचे आभार. पदयात्रेत महिला व तरुणांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ज्या दिवशी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बदनामी करणे थांबवतील त्या दिवशी आम्हीही आरएसएस व भाजपाबद्दल ‘सत्य’ सांगण्याचे बंद करू.

जिस दिन भाजपा व आरएसएस हमारे नेताओं के बारे में झूठ बोलना बंद करेंगे, उसी दिन से हम उनके नेताओं के बारे में सच बोलना बंद कर देंगे :@Jairam_Ramesh pic.twitter.com/8JjZYbeZ7p

— Maharashtra Congress (@INCMaharashtra) November 20, 2022

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदार बारणे, बाळा भेगडे यांच्याकडून ओझर्डे हेलिपॅडवर स्वागत

विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा भारत जोडो यात्रेचे राज्य समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारत जोडो यात्रा हा आपल्या सर्वांसाठी एक ऐतिहासिक व अविस्मरणीय क्षण ठरला आहे. लोकशाहीतील स्तंभ डळमळीत होत असताना ते मजबूत रहावेत यासाठी ही पदयात्रा काढण्यात आलेली आहे. याबरोबर जनतेच्या मुलभूत प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम झाले. महागाई, बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. बेरोजगारीमुळे तरुणांमध्ये नैराश्य असल्याचे दिसले, हे वातावरण बदलले पाहिजे यासाठी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेने पदयात्रेचे उस्फूर्त स्वागत केले. तसेच राज्याच्या काना-कोपऱ्यातून विविध सांस्कृतीचे दर्शन दररोज घडले. शेगावची सभा हा पदयात्रेतील परमोच्च क्षण ठरला, अपेक्षेपेक्षा जास्त लोकांनी सभेला उपस्थिती लावली.

हेही वाचा – वडगाव शहर पाणीपुरवठा योजनेवरुन राजकारण तापलं! ‘अपयश झाकण्यासाठी त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरु’, अनंता कुडेंची बोचरी टीका

पदयात्रेत विविध सामाजिक संस्था व संघटनांनी सहभाग घेतला त्यात ‘लोकायत’ या संस्थेने भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याविषयाची पत्रके वाटून जनजागृती करण्याचे काम केले. पदयात्रा पुढे निघून गेल्यानंतर मागे पडलेला कचरा, पाण्याचा बाटल्या उचलून रस्ता स्वच्छ करण्याचे काम प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाने केले. ही दोन्ही कार्य उल्लेखनीय आहेत. जनतेने दिलेल्या प्रतिसादाबद्दल थोरात यांनी आभार व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे अध्यक्ष जयराम रमेश, प्रभारी, एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

https://youtu.be/fEa_kopx2I0


dainik maval jahirat

Previous Post

तुंग गावचे युवा नेते दिनेश पाठारे, रमेश पांगारे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

Next Post

मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bus-Accident

मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.