Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघात आमदार सुनिल शेळके यांनी दणदणीत विजय संपादन केला. शेळके यांनी विरोधी उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा लाखाहून अधिक मतांच्या फरकाने पराभव केला. सुनिल शेळके यांच्या या ऐतिहासिक विजयाचे सेलिब्रेशन संपूर्ण मतदारसंघात झाल्याचे पाहायला मिळाले.
शहरी भागाप्रमाणेच मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात देखील सुनील शेळके यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातील विविध जिल्हा परिषद गटात सुनीस शेळके आघाडीवर राहिले. त्यामुळे सुनील शेळके यांच्या विजयानंतर येथील कार्यकर्त्यांनी एकत्र येत विजयोत्सव साजरा केला.
तळेगाव शहरात जंगी मिरवणूक
आमदार सुनिल शेळके यांच्या विजयानंतर त्यांचे होमटाऊन असलेल्या तळेगाव दाभाडे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. विजयानंतर शेळके हे जेव्हा तळेगाव शहरात आले, तेव्हा त्यांच्या घरासमोर आणि कार्यलयासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
वडगाव शहरात महिलांकडून भंडाऱ्याची उधळण
शनिवारूी मतमोजणी सुरु असताना जेव्हा सुनिल शेळके यांनी विजयी आघाडी घेतली, त्यानंतर वडगाव मावळ शहरातील शेळके यांच्या समर्थकांनी एकत्र येत भंडाऱ्याची उधळण केली. डीजेच्या दणदणाटात बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात आली, त्यावेळी महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग दिसून आला.
लोणावळ्यात महायुतीकडून आनंदोत्सव
सुनिल शेळके यांचा विजय निश्चित झाल्यानंतर लोणावळा शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत भंडाऱ्याची आणि गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. महायुतीचे पदाधिकारी आणि शेळकेंचे बहुतांष समर्थक विजयोत्सवात सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर : राज्यातील ‘हे’ 5 निकाल ठरले सर्वात धक्कादायक, अजूनही विश्वास बसेना
– भाजपाने लढवल्या 148 जागा, निवडून आल्या 132 जागा ; एका क्लिकवर पाहा भाजपाने लढवलेल्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल