व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

हरिनामाच्या जयघोषात दुमदुमली पवनानगरी ; पवना शिक्षण संकुलात दिंडी सोहळा व संविधान दिन उत्साहात संपन्न । Pavananagar News

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 27, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
Dindi ceremony Constitution Day celebrated in Pavana Education Complex Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवना शिक्षण संकुलातील पवना विद्या मंदिर व लायन शांता मानेक पवना जुनिअर कॅालेज, कै सौ मिराबाई दशरथ भोंगाडे प्राथमिक विद्यालयाच्या वतिने घेण्यात आलेल्या दिडीं सोहळ्याने पवनानगरीला भक्तीमय आळंदीचे स्वरूप आले होते. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेने कार्तिकी महाएकादशी व आळंदी यात्रेनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते. सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी वारकऱ्यांची वेषभुषा करून या दिंडीमध्ये शाळेतील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मुक्ताबाई या संताच्या वेषभूषा परिधान करून हरिनामाच्या जयघोषात त्यांची पालखीबरोबर मिरवणुक काढण्यात आली होती.

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील २५ वर्षांपासून शाळेत दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते आज पवना कृषक सहकारी संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ जाधव व त्यांचा पत्नी महागावच्या माजी सरपंच सुरेखा जाधव माऊलींच्या प्रतीमचे व पालखीचे व विना पूजन करण्यात आले तसेच काले विठ्ठल रुक्मिणी मंदिरचे विश्वस्त प्रल्हाद कालेकर व विमल कालेकर यांच्या हस्ते ग्रंथ दिंडीचे पूजन करण्यात आले.

यावेळी जाधव बोलताना म्हणाले कि,दिंडी सोहळा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांवर बालवयातच संस्कार होतात त्यामुळे संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्राचे कार्य व संताचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात होतात त्यामुळे शालेय पातळीवर असे दिंडी सोहळ्यांची गरज आहे. यावेळी काले पवनानगरचे सरपंच खंडूजी कालेकर,लोणावळा ग्रामीणचे पोलिस जमादार विजय गाले व पोलिस हवालदार जय पवार, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर ठाकर, किशोर शिर्के, ओंकार मंडळाचे अध्यक्ष कैलास कालेकर दत्तात्रय बोडके, गणेश ठाकर,सजन बोहरा, शशिकांत घरदाळे, संतोष दळवी अनेक माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते.

दिंडी शाळेतुन निघाल्यानंतर पवनानगर पाटबंधारे वसाहत येथुन पवनानगर चौक,काले गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा पर्यंत पालखी नेण्यात आली. दिंडीमध्ये भजन पथका बरोबरच लेझिम पथक,वृक्ष दिंडी,ग्रंथ दिंडी,पर्यावरण दिंडी यांनी सहभाग घेतला होता यावेळी शाळेतील १५० विद्यार्थीनींनी टाळांच्या ठेक्यात नादब्रम्ह व संताचा जीवनपट सादर केला या आवाजामुळे पवनानगर परिसर दुमदुमून गेला होता या पथकांनी पवनानगर चौकात प्रात्यक्षिके दाखवुन नागरिकांची वाहावाह मिळविली. अनेक ठिकाणी दिंडीचे जोरदार स्वागत केले.अनेक ठिकाणी ग्रामस्थ व शिक्षक यांनी सांप्रदायिक खेळ, फुगडी खेळत दिंडीत सहभागी झाले होते.त्यामुळे पवनानगरला आळंदीचे स्वरूप प्राप्त झाले होते हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.महिलांनी जागोजागी पालखीची ओवाळणी करून पूजन केले.

यावेळी पवनानगर व्यापारी मित्र मंडळ,मार्च १९९९- २००० बॅच यांनी पवनानगर चौकात भव्य महाआरती आयोजित केली होती यामध्ये परिसरात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दुर्गामाता मित्र मंडळ पाठबंधारे वसाहत,शिवतेज मित्र मंडळ, ॐ श्री भैरवनाथ मंडळ,व सामाजिक संस्थांनी विद्यार्थ्यांना जागोजागी खाऊ व फराळाचे वाटप केले. काले येथील विट्ठल रूक्मिणी मंदिरात आरती घेऊन फराळाचे वाटप करत पालखीचा समारोप करण्यात आला.

दिंडी सोहळ्याचे आयोजन यशस्वी नियोजन प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका अर्चना शेडगे यांंच्या मार्गदर्शनाखाली दिंडी प्रमुख गणेश ठोंबरे यांच्यासह सर्व पवना शिक्षण संकुलातील सर्व शैक्षणिक विभागाचे प्रमुख व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचा-यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव ढाकणे यांनी केले तर सुत्रसंचलन भारत काळे यांनी केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सुनिल शेळके यांच्या ऐतिहासिक विजयानंतर मावळात गावोगावी विजयी मिरवणूका, डिजेच्या ठेक्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष
– दारू पिऊन साक्ष नोंदवणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल, वडगाव मावळ येथील प्रकार । Vadgaon Maval
– मावळातील धक्कादायक घटना ! रस्त्याच्या बाजूला पोत्यात आढळला महिलेचा मृतदेह, तपास सुरु । Maval Crime


Previous Post

काशीचे राजे राजबहादूर यांनी घेतले तुकोबांचे दर्शन ; देहू संस्थानच्या वतीने राजेंचा विशेष सन्मान । Dehu News

Next Post

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, पाहा प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vidhan Sabha Election Deposits of 259 candidates in 21 constituencies of Pune district seized

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघातील 259 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, पाहा प्रत्येक मतदारसंघाची आकडेवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.