Dainik Maval News : गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे दिनांक २५ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर २०२४ दरम्यान पार पडलेल्या २८व्या आयएमएफ वेस्ट झोन क्लायंबिंग स्पर्धेत लोणावळा शहरातील शिवदुर्ग मित्र कलायंबिंग टीमच्या तीन स्पर्धकांनी सहभाग नोंदवित कांस्य पदकाची कामगिरी केली आहे. या तिन्ही खेळाडूंची राष्ट्रीय कलायंबिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
आयुष संदीप पवार याने १४ वर्षाखालील वयोगटात लीड क्लायंबिंग प्रकारात कांस्य पदक मिळविले. आयुष सुधीर वर्तक याने १७ वर्षा पुढील वयोगटात बोल्डरींग या प्रकारात कांस्य पदक मिळवले आणि श्रुती भिवाजी शिंदे हिने १७ वर्षापुढील मुली या वयोगटात लीड क्लायंबिंग आणि बोल्डरींग या दोन्ही प्रकारात कांस्य पदक मिळविले.
तिन्ही खेळाडूंची आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धकांच्या या यशाबद्दल सर्व स्पर्धकांचे आणि प्रशिक्षक योगेश उंबरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांना भेटण्यासाठी मावळच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांची गर्दी, महिला वर्गाची लक्षणीय उपस्थिती
– नवनिर्वाचित आमदार शंकरभाऊ मांडेकर यांनी घेतली आमदार सुनिल शेळके यांची भेट । Talegaon Dabhade
– स्तुत्य उपक्रम ! वडगाव मावळ शहरातील सर्व अंगणवाडी केंद्रातील ४५५ विद्यार्थ्यांना उबदार स्वेटर भेट । Vadgaon Maval