व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला गडावर भाविकांनी फोडले फटाके, मधमाशांच्या पोळ्याला इजा पोहोचल्याने संतप्त मधमाशांचा भाविकांवर हल्ला । Karla News

वर्षाचा पहिला दिवस असल्याने बुधवारी (दि.1) कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 2, 2025
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Devotees of Ekvira Devi attacked by angry bees at Karla Fort Maval News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वर्षाचा पहिला दिवस असल्याने बुधवारी (दि.1) कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. परंतु या गर्दीतील काही हुल्लडबाज आणि अतिउत्साही भाविकांनी धूराचे फटाके फोडल्याने गडावर असलेल्या मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली आणि संतप्त मधमाशांनी गडावरील भाविकांवर हल्ला चढवला. यामुळे काहीवेळ एकच गोंधळ उडाला होता. मधमाशांच्या या हल्ल्यात काही भाविक किरकोळ जखमी झाले.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी कार्ला गडावर एकविरा देवीच्या दर्शनासाठी अनेक भाविक दाखल झाले होते. मोठ्या संख्येने भाविक गडावर उपस्थित होते. यात काही भाविक हे पालख्या घेऊन गडावर आले होते. यातील काही भाविकांनी वाद्यांचा जोरजोरात आवाज करीत रंगीत धुराचे फटाके फोडले. यातून पसरलेल्या धुरामुळे मधमाशांच्या पोळ्याला धक्का बसला व मधमाशा संतप्त झाल्या.

संतप्त मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. लेणी परिसरात असलेले मधमाश्यांचे पोळे उठले आणि त्यांनी गडावर आलेल्या भाविकांवर हल्ला केला. यामुळे गडावर काहीकाळ भाविकांची धांदल उडाली होती. भाविकांच्या या पळापळीने मधमाश्या आणखीनच पसरल्या. दुपारी साधारण साडेबाराच्या दरम्यान ही घटना घडली.

अतिउत्साही भाविक आणि नियोजनाचा अभाव यामुळे अशा घटना घडत असतात. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही. परंतु अनेक भाविक जखमी झालेत. स्थानिक ग्रामस्थ व एकविरा देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांनी जखमींना तत्काळ गडावरून खाली आणले आणि प्रथमोपचार केले. काही भाविकांना उपचारासाठी दवाखान्यातही हलविण्यात आले. काही कालावधीनंतर एकविरा मंदिर परिसरातील परिस्थिती पूर्ववत झाली.

गडावर फटाका बंदी कायम ठेवण्याची मागणी –
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी आली होती, त्या पालखीतल्या काही भक्तांनी फटाके वाजविले. त्याचा फटका बाकीच्या भक्तांना बसला, अशी चर्चा होत आहे. परंतु या घटनेनंतर गडावर फटाके वाजविण्यावर बंदी असतानाही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात व फटाके फोडतात. यामुळे यापुढे एकविरा गडावर फटाका बंदी कायम असावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अनाधिकृत नळजोड धारकाला वीस हजाराचा दंड, उघड्यावर कचरा टाकल्यास एक हजाराचा दंड, नगरपंचायतीचा निर्णय । Dehu News
– कचऱ्यातील नारळापासून कोकोपीट खताची निर्मिती ; तळेगाव नगरपरिषदेचा पर्यावरणपूरक उपक्रम । Talegaon Dabhade
– चौकाचौकात वाहतूक कोंडी ! वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांसह मावळातील स्थानिक नागरिक त्रस्त । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

संपूर्ण जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची सूचना । cm devendra fadnavis

Next Post

मोठी बातमी : कामशेत ते तळेगाव दरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक ; पुणे-लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द । Pune-Lonavala Local

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pune-Lonavla-Local

मोठी बातमी : कामशेत ते तळेगाव दरम्यान रविवारी रेल्वेचा विशेष पॉवर ब्लॉक ; पुणे-लोणावळा सर्व लोकल फेऱ्या रद्द । Pune-Lonavala Local

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.