सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असणाऱ्या मावळ तालुक्यातील विविध विकास कामांबाबतची आढावा बैठक नुकतीच पार पडली. आमदार सुनिल शेळके यांच्या उपस्थितीत अधीक्षक अभियंता कार्यालय, पुणे येथे ही बैठक संपन्न झाली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत लोणावळा हॉस्पिटल, इंद्रायणी नदीवरील टाकवे येथील पूल, वडगाव येथील मुख्य रस्ता, प्रशासकीय इमारत, पोलीस स्टेशन इमारत, तसेच आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता, शिळींब ते घुसळखांब रस्ता अशी कामे सुरु आहेत. या कामांची सद्यस्थिती आणि अडचणी यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ( MLA Sunil Shelke Held Review Meeting On Various Developments Projects Of Maval Taluka By Public Works Department Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘पावसाळा संपल्याने रखडलेल्या विकास कामांना सुरुवात करण्यात यावी. अपुर्ण असलेल्या कामांना गती देऊन कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा. तालुक्यातील महत्त्वपूर्ण कामे असल्यामुळे ही कामे दर्जेदार व्हावीत, याकडे ठेकेदार व अधिकारी यांनी लक्ष द्यावे’ अशा सुचना आमदार सुनिल शेळके यांनी यावेळी दिल्या.
सदर बैठकीला आमादर सुनिल शेळके यांच्यासह कार्यकारी अभियंता उत्तर विभाग आर.वाय. पाटील, कार्यकारी अभियंता दक्षिण विभाग अजय भोसले, उपअभियंता सुरेश पठाडे, उपअभियंता जान्हवी रोडे आदी अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? वाचा भारतीय संविधानाची 9 मुख्य वैशिष्ट्ये । Constitution Day
– 26/11 – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला 14 वर्षे पूर्ण… ती एक काळ रात्र होती, शेकडो मृत्यू अनेकजण जखमी