व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पवन मावळातील मौजे शिळींब गावात ३९५ वा शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा । Shiv Jayanti 2025

मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवारी (दि.१९) विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 21, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती बुधवारी (दि.१९) विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिळींब गावातील ‘शिवराय फ्रेंड्स सर्कल गावठाण’ या मंडळाच्या वतीने सलग आठव्या वर्षी भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शिवजयंती दिनी, सर्वप्रथम गावातील सर्व शिवभक्तांनी ऐतिहासिक किल्ले तिकोणा गडावर जात शिवज्योत प्रज्वलित केली व शिवदौड घेत ती ज्योत वाजत-गाजत गावात आणली. गावातील महिला भगिनींनी शिवज्योतीचे पूजन केले व ज्योत मंडपात स्थापित करण्यात आली. यानंतर शिवप्रतिमेचे पूजन करून सामुहिक महाआरती व शिववंदना संपन्न झाली. तदनंतर मंडळाच्या वतीने सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ते कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले. यात प्रामुख्याने निबंध स्पर्धा, लिंबू चमचा – संगीत खुर्ची स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, महिला वर्गासाठी खास ‘खेळ रंगला पैठणीचा – होम मिनिस्टर’ स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी प्रत्येक स्पर्धेतील विजेत्यास मंडळाच्या वतीने खास आकर्षक बक्षीस देण्यात आले.

  • सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्यानंतर, छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेची सजविलेल्या पालखीतून गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काही लहान मुलांनी बाल शिवाजीचे रूप साकारले होते. यामुळे गावात प्रत्यक्ष बालशिवाजी आल्याचा भास होत होता. सोबत तरूण – तरूणींनी पारंपारिक वेशभूषा परिधान करण्यावर भर दिला होता. तर सर्वच वयोगटातील नागरिक पारंपारिक वेशभूषा करून मिरवणूकीत सहभागी झाले होते. भगवा ध्वज हाती घेत, फेर धरत, फुगड घालत पारंपारिक वाद्यांच्या तालावर ही मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

शिवजयंती कार्यक्रमस्थळी, श्री महादेव मंदिर येथे मिरवणूकीची सांगता झाली. तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. त्यानंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध शिवचरित्रकार, हभप प्रतिभाताई महाराज कोकाटे यांची सुश्राव्य कीर्तनरूपी सेवा पार पडली. यावेळी शिळींबसह संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे, राजमाता जिजाऊ यांच्या कार्याचे दाखले देत हभप प्रतिभाताई यांनी सुंदर प्रबोधन केले. अखेरीस महाप्रसाद वाटपाने शिवजयंती सोहळा २०२५ कार्यक्रमाची सांगता झाली.

शिवजयंती सोहळ्यातील काही क्षणचित्रे :

395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval
395th Shiv Jayanti Festival Celebrated With Enthusiasm In Shilimb Village of Pavan Maval
Photo Courtesy : Team Dainik Maval

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

उड्डाणपुलाचे काम मुदतीत सुरू न झाल्यास लोणावळा नगरपरिषदेला टाळे ठोकणार ; आमदार शेळके यांचा इशारा । Lonavala News

Next Post

कामशेतच्या इंद्रायणी कॉलनीत चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित ; अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त । Kamshet News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Water-shut-off

कामशेतच्या इंद्रायणी कॉलनीत चार दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित ; अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

June 6, 2026
Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.