व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

देशातील नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्याय प्रक्रिया सुलभ झाली – आर. एन. विरकुड । Lonavala News

वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता आर. एन. विरकुड यांनी लोणावळा महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत आलेल्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 21, 2025
in लोकल, शहर
RN Virkud gave information about new criminal laws under Indian Code of Justice at Lonavala College

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ येथील सत्र न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता आर. एन. विरकुड यांनी लोणावळा महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत आलेल्या नवीन फौजदारी कायद्यांबद्दल माहिती दिली. या नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने न्याय मिळण्याची प्रक्रिया जलद व सुलभ झाल्याचे त्या म्हणाल्या.

लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या सहयोगाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सहाय्यक सरकारी अभियोक्ता आर. एन. वाणी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप, लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पाळेकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य विशाल पाडाळे, प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

  • विरकुड म्हणाल्या, “मागील वर्षीपर्यंत सुरू असलेले ब्रिटिश कालीन कायदे गुन्हेगारी रोखण्यासाठी नाही तर सत्ता केंद्र राखण्यासाठी बनविले गेले होते. केंद्र सरकारने या कायद्यात बदल करत नवीन कायदे तयार केले आहेत. 1 जुलै 2024 पासून हा नवीन कायदा अमलात आला आहे. या नवीन कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेत समाजातील लोकांना सामावून घेतले आहे आणि पिडीत नागरीकांना न्याय मिळणे सुलभ झाले आहे.”

नवीन कायद्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने न्याय प्रक्रिया जलद गतीने होत आहे, असे त्या म्हणाल्या. “पूर्वी न्याय लवकर मिळत नव्हता, पण आता न्याय लवकर मिळणार आहे. सामान्य जनतेला समोर ठेवून हे नवीन कायदे बनवण्यात आले आहेत. जुन्या कायद्यातील त्रुटी दूर करत नवीन कायदे बनवण्यात आले आहेत,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले विविध ड्रग्ज सेवन कसे घातक आहे याची माहिती देत कोणत्याही नशे पासून दूर राहण्याचा सल्ला दिला. तसेच नवीन वाहन कायद्याची माहिती देखील विद्यार्थ्यांना दिली. दत्तात्रय पाळेकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मोबाईलच्या अति आणि चुकीच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. प्राचार्य डॉ. देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर प्राध्यापक काटकर यांनी सूत्रसंचालन केले. विशाल पाडाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


dainik maval jahirat

Previous Post

मळवली येथील बैलगाडा शर्यतीत ताजूबाई व शिवन्या बालगुडे फायनलचे मानकरी । Lonavala News

Next Post

‘माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल जाहीर ; धामणे आणि पवनानगर येथील शाळा प्रथम । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Results of mazi shala sundar shala competition announced maval taluka

'माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धेचा निकाल जाहीर ; धामणे आणि पवनानगर येथील शाळा प्रथम । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.