व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नागरिकांचा पैसा व वेळ वाचणार, चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा ; खासदार बारणेंच्या पाठपुराव्याला यश

मागील 25 वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांसाठी व टपाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 22, 2025
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Chinchwad East Sub Post Office has been included in the Head Post Office

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मागील 25 वर्षापासून पिंपरी-चिंचवडकरांसाठी व टपाल कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्यात आला आहे. यासाठी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी चिंचवड पोस्टला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आदेश गुरुवारी (दि.20) प्राप्त झाला आहे.

  • पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व उपटपाल कार्यालय पुणे स्टेशन येथील मुख्य कार्यालयाअंतर्गत जोडली होती. त्यामुळे शहरातील 35 उपटपाल कार्यालयांचा कार्यभार पुणे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेशित करण्यात येत होता. टपाल कार्यालयासाठी लागणारे पैसे पुणे कार्यालयातून पोहोचवले जात होते. त्यात वेळ जात होता. नागरिकांची सर्व काम होत नव्हती. अधिकार मर्यादित होते.

चिंचवड टपाल कार्यालयाला मुख्य टपाल कार्यालयाचा दर्जा देण्याची मागणी राष्ट्रीय डाक कर्मचारी संघटन वर्ग 3 चे महाराष्ट्र व गोवा परिक्षेत्राचे सहाय्यक क्षेत्रीय सचिव काळुराम पारखी यांनी अडीच महिन्यांपूर्वी खासदार बारणे यांच्याकडे केली होती. ( Chinchwad East Sub Post Office has been included in the Head Post Office )

खासदार बारणे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली ;
मावळ लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये सर्व प्रशासकीय कार्यालयांची मुख्यालय सद्यस्थितीत अस्तित्वात येत आहेत. त्यामुळे एक मुख्य टपाल कार्यालय देखील असावे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. टपाल कार्यालयात लोकांची मोठी कामे असतात. मुख्य टपाल कार्यालय शहरात नसल्याने नागरिकांना पुण्यात जावे लागते. त्यासाठी चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्याची मागणी खासदार बारणे यांनी केली. त्याची तत्काळ दखल घेत मंत्री सिंधिया यांनी मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. त्यानुसार चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश झाल्याचा आदेश गुरुवारी प्राप्त झाला आहे.

शहरातील उपटपाल कार्यालयांना मर्यादित अधिकार होते. त्यामुळे महत्वाच्या कामांसाठी नागरिकांना पुण्यात जावे लागत होते. पैसे, वेळ वाया जात होता. चिंचवड पूर्व उपटपाल कार्यालयाचा मुख्य टपाल कार्यालयामध्ये समावेश झाल्याने नागरिकांना टपालच्या कोणत्याही कामासाठी पुण्यात जावे लागणार नाही. चिंचवडचे मुख्य कार्यालय झाले आहे. कर्मचारी वाढणार आहेत. नागरिकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. रोख निधीची कामे लवकर पार पाडली जाणार आहेत. विमाधारकांचे दावा प्रकरण, पेन्शन इत्यादीची कामे सुलभ होण्यास मदत होणार आहे. शहरात टपाल कार्यालयाचे मुख्यालय झाले आहे. भविष्यात विभागीय कार्यालय देखील होणार आहे. – श्रीरंग बारणे, खासदार, मावळ

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


Previous Post

दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा

Next Post

मावळ तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू, 7 हजार विद्यार्थ्यांनी सोडविला मराठीचा पेपर ! SSC Exam 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

मावळ तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत सुरू, 7 हजार विद्यार्थ्यांनी सोडविला मराठीचा पेपर ! SSC Exam 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Santosh Raut elected as chairman of public health committee of primary health center in Yelse

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समिती अध्यक्षपदी संतोष राऊत यांची निवड

March 29, 2026
Pune Rural Police Force achieves huge success in e-Governance 150 Days program

पुणे ग्रामीण पोलीस दलाला ई-गव्हर्नन्स १५० दिवस कार्यक्रमात घवघवीत यश ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा गौरव

March 29, 2026
Lonavala Municipal Council Chief Officer cabin opened on orders of District Magistrate

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उघडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन ; लोणावळा नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचे मनोमिलन

March 28, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड ! पाहा सर्व विषय समित्यांची यादी

March 28, 2026
PM-Rahat scheme for road accident victims Immediate cashless treatment relief of up to one and half lakh rupees

PM-RAHAT : रस्ते अपघातग्रस्तांसाठी जीवनदायी ‘पीएम-राहत’ योजना : अपघातग्रस्तांना तात्काळ दीड (१.५०) लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचाराचा दिलासा

March 28, 2026
school

‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’ योजनेअंतर्गत ४०५ शाळा विकसित करण्यास राज्य शासनाची मंजूरी

March 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.