व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सांगवीतील एकवीस वर्षीय बेपत्ता तरूणीचा लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला मृतदेह । Lohgad Fort

शोध मोहीम सुरू असताना गड पायथ्याशी असलेल्या घेरेवाडीकडील बाजूस असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 21, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे
Body of 21 year old missing girl from Sangvi found at foot of Lohagad Fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सांगवी (पिंपरी-चिंचवड) येथील मानसी प्रशांत गोविंदपुरकर ही एकवीस वर्षीय तरूणी मंगळवार, दि. १८ मार्च पासून बेपत्ता होती. तिचा मृतदेह गुरुवारी (दि.२० मार्च) किल्ले लोहगडाच्या पायथ्याशी आढळून आला आहे. गुरुवारी शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी बेपत्ता मानसीचा शोध घेतला असता गडपायथ्याशी असलेल्या नवग्रह मंदिराजवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला.

मानसी गोविंदपुरकर ही तरूणी मंगळवारी घरातून कॉलेजला जात असल्याचे सांगून किल्ले लोहगड परिसरात आली होती. मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास एका टॅक्सीतून ती एकटीच गडावर आल्याचे व गडावर जाताना तिकीट काऊंटर वरील सीटीटीव्हीत दिसल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यानंतर तरूणीचे नातेवाईक, पोलीस व शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सदस्यांनी गडावर, पाण्याचे टाके, तलाव व गड पायथ्याशी तिचा शोध घेतला.

  • शोध मोहीम सुरू असताना गड पायथ्याशी असलेल्या घेरेवाडीकडील बाजूस असणाऱ्या नवग्रह मंदिराच्या जवळ झाडाझुडपात तिचा मृतदेह आढळून आला. शिवदुर्गच्या सदस्यांनी अथक प्रयत्नातून तरूणीचा मृतदेह बाहेर काढला व पोलिसांच्या स्वाधीन केला. गडावरून पडून तिचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, परंतु अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

शिवदुर्ग रेस्कू टीमच्या सचिन गायकवाड, महेश मसने, सुनिल गायकवाड, वैष्णवी भांगरे, अमोल सुतार, करण वरे, सागर कुंभार, सागर दळवी, मयुर दळवी, कुणाल कडू, आयुष वर्तक व लोणावळा ग्रामीण पोलीस, स्थानिक नागरिक यांनी शोधकार्यात मदत केली.

आत्महत्या केल्याचा संशय
दरम्यान ही तरूणी एकटीच इथे का आणि कशासाठी आली, या प्रश्नाचा शोध घेत असता, तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– अर्थसंकल्पात घोषणा होते, पण वर्षानुवर्षे काम होत नाही ; तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकसाठी तातडीने भूसंपादन करा
– तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील अतिक्रमणे ‘पीएमआरडीए’च्या रडारवर ; कारवाईस प्रारंभ
– तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक ; एसीबीच्या पथकाची कारवाई


dainik maval jahirat

Previous Post

चावसर गावातील महिलांचा पाण्यासाठी संघर्ष ; ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण

Next Post

तो अपघात नाही तर घातपात : हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती, कामगारांशी वाद आणि पगार कपात…

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
hinjewadi Tempo Travellers fire case

तो अपघात नाही तर घातपात : हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स दुर्घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती, कामगारांशी वाद आणि पगार कपात...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.