व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा

ग्रामपंचायत निवडणूक : 23 डिसेंबरपर्यंत जवळ शस्त्र बाळगण्यास मनाई, कलम 144 लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, वाचा

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 1, 2022
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Gram-Panchayat-Election 2022

Photo : Gram Panchayat Election


पुणे जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17(3)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून 23 डिसेंबरपर्यंत हे निर्बंध राहणार आहेत. ( Gram Panchayat Election 2022 Restriction on possession of arms Section 144 Applicable )

राज्य निवडणूक आयोगाने ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्यावने तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या पुणे‍ जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात असून 18 डिसेंबरला मतदान तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख 23 डिसेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

23 डिसेंबरपर्यंत परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे जवळ बाळगण्यास मनाई

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

हेही वाचा – आंदर मावळातील ‘या’ गावांत घरोघरी येणार जलगंगा, आमदार शेळकेंच्या माध्यमांतून 4 कोटींच्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन

384 शस्त्र परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो अशा 384 शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिले आहेत. यामध्ये जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 7, भोर- 24, घोडेगाव- 4, खेड- 8, आळेफाटा- 4, माळेगाव- 53, वडगाव निंबाळकर- 49, वालचंदनगर- 40, भिगवण- 29, इंदापूर- 19, यवत- 22, शिरुर- 9, रांजणगाव- 3, राजगड- 14, वेल्हा- 68, पौड- 20, लोणावळा ग्रामीण- 2, लोणावळा शहर- 1, मंचर- 4 आणि पारगाव पोलीस ठाणे हद्दीतील 4 शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. 23 डिसेंबरनंतर 7 दिवसांच्या आत संबंधितांना शस्त्र परत करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतदान व मतमोजणी केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश

221 ग्रामपंचायतीसाठी मतदानाचा दिवस 18 डिसेंबरला ते मतमोजणीचा दिवस 20 डिसेंबर या कालावधीत मतदान केंद्र तसेच मतमोजणी केंद्राच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

अधिक वाचा –

– स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून ‘चलो दापोडी’चा नारा
– तब्बल 25 वर्षांनी पुन्हा भरली शाळा! न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 1996च्या बॅचचा स्नेहमेळावा, शाळेच्या पटांगणात मैत्रीचा रौप्यमहोत्सव


dainik maval jahirat

Previous Post

स्वातंत्र्यसूर्य हुतात्मा भाई कोतवाल जयंतीनिमित्त दापोडीत कार्यक्रम, अशोक मगर यांच्याकडून ‘चलो दापोडी’चा नारा

Next Post

मोठी कारवाई! पुणे शहरात 17 लाखांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मोठी कारवाई! पुणे शहरात 17 लाखांचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.