व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नूतन अभियांत्रिकी आणि एल अँड टी यांच्यात सामंजस्य करार ; ‘विद्यार्थ्यांना शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्रात प्रगतीस मदत होईल’ – बाळा भेगडे

यामुळे एल अँड टी लिमिटेडच्या लर्न कनेक्ट प्लॅटफॉर्म द्वारे सुरुवातीला 2000 विद्यार्थ्यांना औद्योगिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 26, 2025
in लोकल, शहर
MoU between Nutan Maharashtra Engineering College and L&T Limited

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : विद्यार्थ्यांना उद्योगसिद्ध बनविण्यासाठी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयाने एक मोठे पाऊल उचलले आहे. एल अँड टी लिमिटेड आणि नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी यांच्यामध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे एल अँड टी लिमिटेडच्या लर्न कनेक्ट प्लॅटफॉर्म द्वारे सुरुवातीला 2000 विद्यार्थ्यांना औद्योगिक आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश मस्के, प्राचार्य डॉ. एस. एन. सपली, एल अँड टी कंपनीचे निवृत्त लेफ्टनंट कमांडर अमित चौरसिया, महेश पाटील, अनीरुद्ध सरकार आदी मान्यवर उपस्थित होते.

‘एल अँड टी लिमिटेड सारख्या औद्योगिक समुहासमवेत आपल्या महाविद्यालयाचा आज करार झाला. या करारामार्फत अनेक विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रगती करण्यात मदत होईल,’ असे मत म्हस्के यांनी व्यक्त केले.

‘उद्योगाची खरी गरज काय आहे, हे प्रत्येक विद्यार्थ्याला समजले पाहिजे. एल अँड टी लिमिटेडचा लर्न कनेक्ट हा एक डिजिटल पूल आहे, जो विद्यार्थ्यांना थेट औद्योगिक जगतात घेऊन जाणार आहे,’ असे मत प्राचार्य सपली यांनी व्यक्त केले.

या कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रकल्पांचे ज्ञान, डिजिटायझेशन, सॉफ्ट स्किल्स आणि तांत्रिक प्राविण्य अशा विविध क्षेत्रात प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच 150 हून अधिक व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस करता येणार असून तसे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा लोणावळा शहरात सर्वपक्षीयांकडून तीव्र निषेध । Lonavala News
– पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ वडगाव मावळ येथील सर्वपक्षीय मशाल रॅली । Vadgaon Maval
– कामशेतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून पहलगाम येथील क्रूर हल्ल्याचा जाहीर निषेध । Kamshet News


Previous Post

मावळातील कमी पटसंख्येच्या शाळांबाबत तोडगा काढण्याची मागणी ; शिक्षकांचे आमदार सुनील शेळके यांना निवेदन

Next Post

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी लोणावळा दौऱ्यावर ; नगरपरिषदेत घेणार आढावा बैठक । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ramdas Athawale

केंद्रीय मंत्री रामदास आठवले रविवारी लोणावळा दौऱ्यावर ; नगरपरिषदेत घेणार आढावा बैठक । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.