Dainik Maval News : मावळ तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी यंदाचा पावसाळा अधिक आंनददायी ठरणार आहे. मावळ तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये मुंबई, ठाणे परिसरातील नागरिकांची संख्या अधिक असते. या प्रवाशांना प्रवासासाठी मुंबई-पुणे मार्ग हा प्रमुख आहे. परंतु पावसाळ्यात या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि अन्य कारणांमुळे पर्यटकांचा आनंद वाटेतच विरतो. परंतु यंदापासून ही अडचण कायमची दूर होणार आहे. याचे कारणे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून यंदाच्या ऑगस्ट मध्ये हे काम पूर्ण होऊन मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी आणि लहान मोठे अपघात होतात. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होतात, ही बाब लक्षात घेऊन मिसिंग लिंक प्रकल्प साकारण्यात आला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई-पुणे प्रवासातील वेळ वाचेल, इंधन बचत होईल आणि प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होऊन प्रवास अधिक सुखकर होईल.
मिसिंग लिंकच्या पॅकेज एक आणि दोनचे काम 97 टक्के पूर्ण झाले आहे. यातील शेवटचा टप्पा म्हणून सर्वाधिक उंचीचे पुलाचे काम सध्या सुरू आहे. हवेचा दाब आणि पुलाचे काम याची सातत्याने चाचणी करीत काम सुरू आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात असून या प्रकल्पातील सर्वाधिक उंचीवरील पुलाचे काम कुठलीही तडजोड न करता काळजीपूर्वक करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
प्रवाशांचा वेळ वाचणार, इंधन वाचणार
1. मिसिंग लिंकमध्ये खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एक्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग समाविष्ट
2. मिसिंग लिंकमुळे द्रुतगती मार्गावरील मार्गिकेतील सध्याचे 19 किमीचे अंतर 6 किमीने कमी होऊन 13.3 किमी इतके होणार
3. मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत 20 ते 25 मिनिटांची बचत होणार, सोबत इंधन बचत आणि वायू प्रदूषणात घट होणार
4. खंडाळा येथील बोरघाटीतल रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होणार
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या सुधारणा प्रकल्पाबाबत अधिकृत शासन आदेश जारी । Talegaon Chakan Shikrapur Road
– वडीवळे धरण डावा-उजवा कालवा बंदिस्त करणे आणि आढले-डोणे उपसा जलसिंचन योजनेचा डीपीआर तयार करण्याचे निर्देश । Maval News
– मोठी बातमी : मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प भंडारा डोंगराला भेदून जाणार नाही ; रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन