व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सरकारकडून अनेक बंधने ; पाहा मार्गदर्शक सूचनांची संपूर्ण यादी

वैयक्तिक आणि कार्यालयीन अकाउंट स्वतंत्र ठेवावे; शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 1, 2025
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर
GOVERNMENT OF MAHARASHTRA Mantralay

File Image


Dainik Maval News : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

डिजिटल युगात सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी साधन असले तरी त्यातून गोपनीय माहितीचा प्रसार, खोटी माहिती पसरवणे, तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन होवू नये याकरिता मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात आली आहेत.

सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ हे सोशल मीडियाच्या वापराबाबतही लागू राहतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना :
1. राज्य शासनातील अधिकारी-कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम तसेच प्रतिनियुक्तीने किंवा करारपद्धतीने नेमलेले कर्मचारी यांना हे नियम लागू राहणार आहेत.
2. शासनाच्या किंवा भारतातील कोणत्याही शासनाच्या चालू किंवा अलिकडच्या धोरणावर प्रतिकूल टीका करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावा.

3. वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट स्वतंत्र ठेवावेत. केंद्र किंवा राज्य शासनाने बंदी घातलेल्या वेबसाईट किंवा अॅपचा वापर करू नये. शासकीय योजना व उपक्रमांच्या प्रसारासाठी केवळ अधिकृत आणि प्राधिकृत माध्यमांचा वापर करावा.
4. कार्यालयीन कामकाजाच्या समन्वयासाठी व्हॉट्सअॅप, टेलिग्रामसारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करता येईल.

5. शासकीय योजनांच्या यशस्वितेसंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करता येईल; मात्र त्यातून स्वयंप्रशंसा होणार नाही याची दक्षता घ्यावी. वैयक्तिक अकाऊंटवर शासकीय पदनाम, लोगो, गणवेश, शासकीय मालमत्तेचे फोटो किंवा व्हिडिओ अपलोड करू नयेत.
6. आक्षेपार्ह, द्वेषमूलक, भेदभाव करणारा मजकूर पोस्ट किंवा फॉरवर्ड करणे मनाई आहे. प्राधिकृत मंजुरीशिवाय कोणतेही गोपनीय दस्तऐवज सोशल मीडियावर अपलोड करू नयेत. बदली झाल्यानंतर कार्यालयीन सोशल मीडिया अकाऊंट योग्य प्रकारे हस्तांतरित करावे.

शासनाने स्पष्ट केले आहे की, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंगात्मक कारवाई केली जाईल. डिजिटल युगात सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर व्हावा आणि शासकीय यंत्रणेचा विश्वासार्हता अबाधित राहावी, यासाठी नियमावली करण्यात आली आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप


Previous Post

दैनिक मावळ विशेष : ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी’ … मावळ तालुक्यात भातशेतीचं स्वरुप प्रचंड बदललं । Rice Farming in Maval Taluka

Next Post

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत; …अन्यथा पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया रोखणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Minister Chandrakant Patil

‘बी.फार्म’ आणि ‘डी.फार्म’ अभ्यासक्रमाच्या संस्थांना निकष पूर्ण करण्यासाठी एक महिन्याची अंतिम मुदत; ...अन्यथा पहिल्या वर्षातील प्रवेश प्रक्रिया रोखणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.