Dainik Maval News : राजकारणात केवळ घोषणाबाजी करणाऱ्यांची परंपरा मोडून प्रत्यक्ष कृतीतून समाजापुढे आदर्श ठेवणारे नाव म्हणजे प्रशांत भागवत. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारून प्रशांत भागवत यांनी स्वतःच्या कार्यातून नवा आदर्श निर्माण केला आहे.
दिनांक १९ जून २०२५ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त भागवत यांनी आंबा, नारळ, वड, पिंपळ, कैलासपती व खाया यांसारख्या झाडांचे वृक्षारोपण केले होते. वृक्षारोपण करणे हीच जबाबदारी मानणाऱ्या बऱ्याच जणांपेक्षा वेगळे ठरून भागवत हे आजही या झाडांची निगा राखत आहेत. पाणी घालणे, खत टाकणे, तण काढणे आदी जोपासना स्वतः करत असल्यामुळे ही रोपे आता जोमाने वाढत आहेत.
“फक्त झाडे लावून फोटो काढणे म्हणजे पर्यावरण संरक्षण होत नाही. खरी जबाबदारी म्हणजे त्या झाडांचे संगोपन करणे,” असे दादांचे मत असून त्यानुसार ते प्रत्यक्ष कृतीतून उदाहरण घालून देत आहेत.
पर्यावरणाबाबत संवेदनशीलता दाखवणारे प्रशांत भागवत हे केवळ राजकीय नेते म्हणूनच नव्हे तर समाजसेवक आणि पर्यावरण संरक्षक अशी दुहेरी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांचे नाव पुढे येत असले तरी लोकांच्या मनात प्रशांत भागवत यांच्या विषयीचा विश्वास हा त्यांच्या पर्यावरणप्रेमी कार्यामुळे अधिक दृढ होत आहे.
मावळ तालुक्यातील युवकांसाठी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश भागवत यांनी आपल्या कृतीतून जिवंत केला आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक उपक्रमांना नवीन उर्जा मिळत असून प्रशांत भागवत यांचे हे वृक्षप्रेम लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News