व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! शिवसेना जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर, तर मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती । Maval Taluka Shiv Sena

शिवसेनेच्या महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे, जिल्हा समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर, तर जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 15, 2025
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, शहर
Rajesh Khandbhor appointed as Shiv Sena district chief Ram Sawant as Maval taluka chief

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे यांची वर्णी लागली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदी बाळासाहेब वाल्हेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, जिल्हाप्रमुखपदी राजेश खांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे यांची नियुक्ती केली आहे.

उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. गण, गट, प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यादृष्टीने संघटना बांधणी, नियोजन सुरू आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेतही बदल करण्यात आले आहेत. जिल्हाप्रमुख असलेले बाळासाहेब वाल्हेकर यांच्याकडे पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयकपदाची जबाबदारी सोपविली आहे. मावळ तालुकाप्रमुख असलेले राजेश खांडभोर यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाप्रमुख असलेले राजेश वाबळे यांची पिंपरी-चिंचवड महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हा संघटिकापदी शिलाताई भोंडवे यांची नियुक्ती केली आहे. तर, मावळ तालुकाप्रमुखपदी राम सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत शिवसेनेचे उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल केले आहेत.

शिवसेना पुणे जिल्ह्यातील सर्व निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ लोकसभा मतदारसंघात संघटना आणखी मजबूत होईल. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी झपाटून कामाला लागावे. केंद्र, राज्य सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचववेत. राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News


Previous Post

पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या पवन मावळातील आजिवली शाळेचा ईसीए संस्थेतर्फे गौरव । Maval News

Next Post

संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी : मावळवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचा नवा उपक्रम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sanvaad Janateshi Vartalap Patrakaranshi Maval Taluka Marathi Journalists Association New initiative

संवाद जनतेशी, वार्तालाप पत्रकारांशी : मावळवासीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मावळ तालुका मराठी पत्रकार संघाचा नवा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
Maval Taluka Kjaredi vikri sangh to start Cooperative Agricultural Service Center Farmers will get seeds fertilizer

मावळ तालुका खरेदी विक्री संघ सुरू करणार ‘सहकार कृषी सेवा केंद्र’ ; शेतकऱ्यांना मिळणार इंद्रायणी भाताचे बियाणे आणि खत

June 2, 2026
Crackdown on unauthorized night camping in Shirota forest area of ​​Maval two arrested

मावळातील शिरोता वनक्षेत्रात विनापरवानगी नाईट कॅम्पिंगवर धडक कारवाई ; दोन खासगी कंपन्यांचे प्रतिनिधी अटकेत

June 1, 2026
Fatal accident on Mumbai-Pune Expressway Two dead on the spot three injured

Mumbai Pune Expressway Accident । मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात ; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

June 1, 2026
Pavana Dam

Pawana Dam : जलसंपदा मंत्र्यांच्या आश्वासनालाही वर्ष उलटले ; पवना धरणाचे मजबुतीकरण तब्बल १९ वर्षांपासून रखडले

May 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.