व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 20, 2025
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Gram Panchayat Office Balasaheb Thackeray Memorial Matoshree Gram Panchayat Construction Scheme

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रशासनिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालय बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असून, एकूण ८५ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

या योजनेतून टाकवे खुर्द ग्रामपंचायत – २० लाख रू. तर कुसगाव बु. ग्रामपंचायत २५ लाख रू., सांगिसे ग्रामपंचायत २० लाख रू., घोणशेत ग्रामपंचायत २० लाख रू. एकूण ८५ लाख रुपयांच्या निधी मंजूर झाला आहे. या मंजुरीमुळे ग्रामपंचायतींना आधुनिक, सुटसुटीत व नागरिकाभिमुख कार्यालयांची उभारणी करता येणार असून, ग्रामस्थांना अधिक सक्षम व दर्जेदार सेवा उपलब्ध होणार आहेत.

या निर्णयामुळे ग्रामपंचायत कार्यकाळ प्रभावी होईल आणि प्रशासनिक कामकाज सुलभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या निधीसाठी आमदार सुनील शेळके यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पुढाकाराला यश मिळाले असून, तालुक्यातील ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार शेळके म्हणाले, “ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचे केंद्र आहे. सशक्त पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या की ग्रामविकासाला गती मिळते. या निधीमुळे ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक प्रभावी होईल आणि नागरिकांना वेळेवर सेवा मिळेल.” या निर्णयाचे ग्रामस्थ व स्थानिक जनप्रतिनिधींनी स्वागत केले असून, “आमदार सुनील शेळके हे खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे मावळ तालुक्यात अनेक विकासकामे होत आहेत” अशा शब्दांत समाधान व्यक्त केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती यांच्या मानधनात लक्षणीय वाढ – वाचा अधिक
– तळेगाव दाभाडे : राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा – पणन मंत्री जयकुमार रावल
– आगामी निवडणुकांपूर्वी मावळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संघटन बांधणीवर जोर । Maval NCP
– देहूरोड जवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कारचा भीषण अपघात ; 2 जण जागीच ठार । Maval News 


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

Next Post

मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार - जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.