व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

व्हिडिओ : कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटात दरड कोसळण्याचा धोका, प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष । Pawan Maval

कामशेत - पवनानगर मार्गावरील बौर घाटातून दररोज शेकडो शेतकरी, दुग्धव्यवसायिक, हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 22, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, व्हिडिओ, शहर
Video Danger of landslide at Baur Ghat on Kamshet Pawananagar road in maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळातील तीस ते चाळीस गावांसाठी महत्वाची बाजारपेठ असणाऱ्या कामशेत शहराला जोडणाऱ्या कामशेत – पवनानगर मार्गावरील खड्डे ही समस्या कायम असताना, याच मार्गावरील प्रमुख व एकमेव घाट असेल्या बौर घाटात दरड कोसळण्याच्या अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी दरडीचा काही भाग, दगड – गोटे खाली आले असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

कामशेत – पवनानगर मार्गावरील बौर घाटातून दररोज शेकडो शेतकरी, दुग्धव्यवसायिक, हजारो विद्यार्थी, नोकरदार आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. अतिपावसाचा हा प्रदेश असून अनेक वर्षांपासून घाट परिसरात हवी तशी डागडुजी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी घाटात रस्त्याची, साईडपट्ट्यांची दुर्दशा झालेली दिसते. अशात या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

केदारेश्वर मंदिराजवळील दरड धोकादायक अवस्थेत :
मार्गावरील श्री केदारेश्वर मंदिराजवळील डोंगरकड्यांवरून संततधार पावसामुळे दरड कोसळण्याचा आणि दगड-झाडे रस्त्यावर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी दगड रस्त्यावर पडले आहेत. अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही अपघाताचा धोका मात्र कायम आहे. रस्त्याच्या दोन्ही कडांचे भाग ढिसूळ झाले असून कधीही मोठा अपघात घडू शकतो.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी वनविभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच या ठिकाणी घाट परिसरात अन्यत्र असतात त्याप्रमाणे सुरक्षेच्या उपाययोजनांची, जाळी लावण्याची मागणी होत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ चार स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्यान विकासासाठी प्रत्येकी 1 कोटी निधी । Maval News
– मावळचे खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ; वडगाव मावळ कोर्टात बारणेंविरोधात खटला चालणार – जाणून घ्या प्रकरण । MP Shrirang Barne
– मावळ तालुक्यातील ‘या’ ४ ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी ; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : e-KYC साठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक, जाणून घ्या ई-केवायसी करण्याची प्रक्रिया


dainik maval jahirat

Previous Post

“मनोरंजन संध्या २०२५”ची आजपासून होणार सुरूवात, महिलांसाठी खास पर्व ; प्रशांतदादा भागवत युवा मंचचा उपक्रम । Prashant Bhagwat

Next Post

पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट ! जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता । Pune Rain

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Rain

पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट ! जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता । Pune Rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.