व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 10, 2026
in ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित पं.स. सदस्या सुनीता मनोहर येवले यांची, तर उपसभापतीपदी साहेबराव नारायण कारके यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीसह जवळपास पंचवीस वर्षांनंतर मावळ पंचायत समितीमध्ये पक्षाचे पदाधिकारी विराजमान झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Novel NIBR Ads

मागील महिन्यात झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहाही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला होता. तदनंतर सोमवारी (दि.९ मार्च) सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीसाठी मावळ पंचायत समितीच्या सभागृहात पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांनी विशेष सभा आयोजित केली होती.

याप्रसंगी तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान, सहायक गटविकास अधिकारी सेवक थोरात यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सदस्य तथा गटनेते दिलीप ढोरे यांच्यासह साहेबराव कारके, योगेश लोहोर, राजेंद्र कडलक, समीर जाधव, सुनीता येवले, प्राची गायकवाड, आशा मोरमारे, रेश्मा देवकर, शैला कालेकर हे सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

सभापतीपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला याकरिता राखीव असल्याने या पदासाठी चांदखेड गणातून विजयी झालेल्या सुनीता येवले यांचा, तर उपसभापती पदासाठी सोमाटणे गणातून विजयी झालेले साहेबराव कारके यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सुरेंद्र नवले यांनी केली. त्यानंतर प्रशासनातर्फे दोघांचा सत्कार करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्कार सोहळा
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती आणि सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच, खरेदी विक्री संघाचे सभापती व उपसभापती आदींचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार सुनील शेळके, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे, सुरेश चौधरी, काळुराम मालपोटे, नारायण ठाकर, दीपक हुलावळे, माउली ठाकर, कृष्णा कारके, रिपाइंचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, नगराध्यक्षा अबोली ढोरे, महिलाध्यक्षा सुवर्णा राऊत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Novel NIBR Ads

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा !
– महत्वाची बातमी ! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर होणार
– मावळ पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची सोमवारी होणार निवड
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ?


dainik maval jahirat

Previous Post

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

Next Post

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात 'एस्मा' लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.