व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळमधील जमीन प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत ; शेतकऱ्याची थेट कोर्टात धाव

मिळालेल्या माहितीनुसार, उकसान येथील सुमारे 30 गुंठे जमिनीवर स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी आपला वडिलोपार्जित कुळ हक्क असल्याचा दावा केला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 3, 2026
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, लोकल, शहर
Actress Sonali Bendre and her husband Goldie Behl in trouble over land case in Maval Farmer rushes to court

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील उकसान गावात जमिनीच्या वादावरून हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळं संपूर्ण मावळ परिसरात मोठी चर्चा रंगली असून, वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात याबाबत दावा दाखल करण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

मिळालेल्या माहितीनुसार, उकसान येथील सुमारे 30 गुंठे जमिनीवर स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी आपला वडिलोपार्जित कुळ हक्क असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन 1957 पूर्वीपासून त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात आहे. मात्र, काही व्यक्तींनी कथितपणे खोट्या कागदपत्रांच्या आधारे हा हक्क डावलून संबंधित जमीन विक्री व्यवहार करण्यात आला. या व्यवहारात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादी शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केलं आहे की, संबंधित जमिनीवर बेकायदेशीरपणे बांधकाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, त्यांच्या कुटुंबीयांना दमदाटी करून जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही, आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी यापूर्वी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्यामुळं पोलिसांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला.

यानंतर शेतकऱ्यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली असून, सदर जागेवर कोणतेही बांधकाम किंवा व्यवहार होऊ नये यासाठी मनाई आदेश (स्टे ऑर्डर) देण्याची मागणी केली आहे. न्यायालयानं या प्रकरणाची पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्या वतीने त्यांचे वकील राजू शिंदे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फिर्यादी शेतकरी हे केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि आर्थिक फायदा करून घेण्याच्या उद्देशानं खोटे आरोप करत असल्याचा प्रतिदावा त्यांनी केला आहे. तसेच, संबंधित जमीन व्यवहार कायदेशीर पद्धतीनेच करण्यात आला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.

या संपूर्ण प्रकरणामुळं मावळ तालुक्यातील जमीन व्यवहारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवर या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. आगामी सुनावणीत काय निष्पन्न होते, यावर या वादाचा पुढील मार्ग निश्चित होणार आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


dainik maval jahirat

Previous Post

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

Next Post

पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Four subject committees of Pune Zilla Parishad were appointed as chairmen Maval Velhe Haveli Indapur

पुणे जिल्हा परिषदेचे चार विषय समित्यांचे सभापती ठरले ; मावळ, राजगड, हवेली, इंदापूर तालुक्यांना मिळाला मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

July 5, 2026
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू

July 5, 2026
No royalty charged for using soil or murrum from one own farm no police or revenue action will be taken either

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

July 3, 2026
Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

July 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.