व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, April 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

तळेगाव दाभाडे शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 21, 2026
in लोकल, शहर
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, तळेगाव नगरपरिषदेने ७३.१७ टक्के करवसुली करण्यात यश मिळवले आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत १,१७१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

नगरपरिषदेकडून वसूल होण्यासारखी एकूण २८.०७ कोटी रुपयांची रक्कम असून, त्यापैकी २०.५३ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. शहरातील एकूण मालमत्ता कर ३७.१० कोटी रुपये आहे. यामध्ये नॅशनल हेवी कंपनीकडे ६.३८ कोटी, २७ मोबाईल टॉवरकडून १.१२ कोटी, दोन शासकीय धान्य गोदामांकडून ०.२८ कोटी आणि ७७ सील मिळकतींकडून १.२५ कोटी रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

अभय योजनेअंतर्गत नागरिकांना दिलासा मिळत असून, सुमारे २.७ कोटी रुपयांच्या व्याजावर १०० टक्के सूट देण्यात आली आहे. या योजनेमुळे थकबाकीदारांनी कर भरण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या या योजनेचा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे मंजुरीसाठी प्रलंबित असून, मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांना आणखी दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

पाणीपट्टी वसुलीतही नगरपरिषदेने प्रगती साधली आहे. शहरात एकूण १८,२४४ नळजोड असून, त्यापैकी ६,७२४ पाणी मीटर बसवण्यात आले आहेत. एकूण ९.१७ कोटी रुपयांची पाणीपट्टी अपेक्षित असताना ४.३५ कोटी रुपये म्हणजेच ४७.४३ टक्के वसुली करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे आणि मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागामार्फत ही वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


Previous Post

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

Next Post

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
Crime

उर्से येथे जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मालमत्ता कर वसुलीसाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेला नागरिकांचा प्रतिसाद ; तळेगाव नगरपरिषदेकडून ७३.१७ टक्के कर वसुली

April 21, 2026
MP Shrirang Barne MLA Sunil Shelke jointly reviewed development works in Lonavala Vadgaon Talegaon Dabhade

मावळात ‘आप्पा’ आणि ‘आण्णा’ यांचा संयुक्त दौरा ; लोणावळा, तळेगाव, वडगावमधील विकासकामांचा घेतला आढावा

April 21, 2026
Fire and safety training by fire brigade at My Home Society in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडेतील ‘माय होम सोसायटी’मध्ये अग्निशमन दलाकडून फायर अँड सेफ्टीचे प्रशिक्षण

April 21, 2026
LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.