Dainik Maval News : उर्से येथील एका घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळणाऱ्या चार जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल रोशन मनोहर डोंगरे यांनी याबाबत शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उर्सेमधीलच चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी हे उर्से गावात एका घरामागे तीन पानी पत्त्याचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून त्यांच्याकडून १,८३० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम
– लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ
– वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन
– मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक


