व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

मावळ तालुक्यामध्ये कै. पांडुरंग दादा धोंडीबा उंडे यांनी जनसंघाचे कार्य जोमाने केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 2, 2026
in लोकल, ग्रामीण, शहर
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : ​करंजगांवचे माजी सरपंच आणि जनसंघ व भारतीय जनता पार्टी मावळचे ज्येष्ठ नेते कै. पांडुरंग दादा धोंडिबा उंडे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी आज ( दि. २ मे ) पहाटे ३:३० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपाचा एक सच्चा आणि जुन्या पिढीतील कार्यकर्ता हरपला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून आणि स्व. नथुभाऊ भेगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यामध्ये कै. पांडुरंग दादा धोंडीबा उंडे यांनी जनसंघाचे कार्य जोमाने केले. नाणे मावळ आणि आंदर मावळ यांसारख्या दुर्गम भागात त्यांनी पायी प्रवास करून जनसंघाचे विचार पोहोचवले आणि खऱ्या अर्थाने या भागात नवीन कार्यकर्ता घडवण्याचे व त्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले.

​’आदिवासी नेता’ म्हणून पांडुरंग दादा मावळ आणि मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात अत्यंत लोकप्रिय होते. आदिवासी बांधवांना त्यांचे हक्क मिळवून देणे आणि विविध शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवणे यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.

जनसंघातील दिग्गज सहकाऱ्यांची साथ :
त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना कै. रामभाऊ म्हाळगी, कै. कृष्णराव भेगडे, कै. बाबुरावजी घोलप, कै. कांचनभाई शहा, कै. शिवराम बुवा येवले, कै. बळवंतरावजी मामा शेलार, कै. विश्वनाथ भेगडे, कै. नामदेवराव दौंडे, कै. मारुती बाबा शिंदे, कै. जिजाबा शिंदे आणि कै. बबनराव तांबोळी अशा ज्येष्ठ नेत्यांचा सहवास लाभला. याच दिग्गज मंडळींनी मावळ तालुक्यात जनसंघ ते भारतीय जनता पक्षाची मुळे घट्ट रोवली.

​त्यागाची आणि संघर्षाची गाथा :
​पांडुरंग दादा हे जहालवादी विचारांचे आणि तत्त्वाशी तडजोड न करणारे नेतृत्व होते. ​आदिवासी समाजासाठी त्यांनी अनेक वेळा सत्याग्रह केला आणि तुरुंगवास भोगला. ​ऐतिहासिक सिमला कराराच्या निषेध आंदोलनातही त्यांनी कारावास सोसला. असंख्य कार्यकर्ते घडवून त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली.

शनिवारी जेव्हा त्यांचे अंत्यविधी करण्यात आले, त्यावेळी अंत्यसंस्कारापूर्वी त्यांच्या पार्थिवावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा ठेवण्यात आला होता. हे त्यांच्या आयुष्यभराच्या त्यागाचे आणि निष्ठेचे प्रतीक आहे. पांडुरंग दादा यांच्या जाण्याने मावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.
(शब्दांकन: अभिमन्यू शिंदे)

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोणावळा बसस्थानकाची पाहणी
– ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका महत्त्वाची ; सदस्यांची विकासात्मक दृष्टी देईल ग्रामविकासाला चालना
– मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला
– बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर ! राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी – पाहा सविस्तर निकाल


dainik maval jahirat

Previous Post

वाडीवळे येथील रेल्वे भुयारी मार्गासंबंधित विविध समस्यांबाबत हिंदूराष्ट्र सेनेकडून सोमवारी आंदोलनाचा इशारा

Next Post

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! "हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक" - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

Pune News : महाळुंगे येथे भूखंडावर जबरदस्तीने प्रवेश व तोडफोडीचा आरोप; परस्परांवर अतिक्रमणाचे आरोप

August 1, 2026
ahilyadevi holkar karjmukti yojna Loan waivers for 2337 farmers in Maval Taluka

मावळ तालुक्यातील 2337 शेतकऱ्यांची एकूण 11 कोटी 21 लाख रूपयांची कर्जमाफी

August 1, 2026
Inauguration of Talegaon Smart City Vision 2035 workshop in-depth brainstorming on planned development

‘तळेगाव स्मार्ट सिटी व्हिजन – २०३५’ कार्यशाळेचे उद्घाटन ; चर्चासत्रात शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी सखोल विचारमंथन

August 1, 2026
rain image rain alert heavy rain

पुणे जिल्ह्यात सरासरीच्या १७९.९ टक्के पाऊस ; मावळ तालुक्यात सर्वाधिक १६८० मिलिमीटर पावसाची नोंद

July 31, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.