Dainik Maval News : लोणावळा शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या लायन्स पॉईंटच्या दरीमध्ये पडून पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. राकेश कुमार मिश्रा (वय ५० वर्ष) असे या व्यक्तीचे नाव असून ते आयएनएस शिवाजी येथील नौदलाचे कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास राकेश कुमार मिश्रा हे लायन्स पॉईंट परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होते. त्या ठिकाणी दरीच्या कडेने फिरत असताना अचानक तोल गेल्यामुळे ते दरीत पडले. दरीच्या बाजूला अचानक आवाज झाल्यामुळे स्थानिक व्यवसायिकांनी व पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेतली व या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला दिली.
यानंतर घटनास्थळी पोलिसांसह स्थानिक नेव्ही पथक, शिवदुर्ग रेस्क्यू टीम दाखल झाल्या. बचाव पथकाने अथक परिश्रम केल्यानंतर सुमारे पाच तासानंतर राकेश कुमार मिश्रा यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यंत्रणांना यश आले. लायन्स पॉइंट परिसरामध्ये घडलेली या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे