व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

आंदर मावळला शहराशी जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाने घेतली गती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 30, 2026
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आंदर मावळ विभागाला शहर भागाशी जोडणाऱ्या महत्त्वाच्या भोयरे–सावळा रस्त्याच्या कामाने सध्या वेग घेतला असून डांबरीकरणासह रस्ता रुंदीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. गेली अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या मार्गाच्या सुधारित कामामुळे परिसरातील वाहतूक अधिक गतिमान होणार असून पर्यटनवाढीलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोंडिवडे, भोयरे, किवळे, पारीठेवाडी, अनसुटे, मानकुली, कुणे, कुणेवाडी, तळपेवाडी, माळेगाव बुद्रूक ते सावळा या गावांना जोडणारा हा मार्ग आंदर मावळातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जातो. रस्ता सुकर झाल्यानंतर दुचाकी, चारचाकी, बस तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची ये-जा अधिक वेगाने होणार आहे. त्यामुळे दळणवळण सुलभ होण्यासोबतच स्थानिक अर्थकारणालाही बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.

मात्र, रस्त्याचे काम अंतिम टप्प्याकडे जात असताना ग्रामस्थांनी सुरक्षिततेचा मुद्दाही पुढे आणला आहे. अनेक गावांच्या हद्दीतून जाणाऱ्या या मार्गालगत प्राथमिक शाळा, बसथांबे तसेच वयोवृद्ध नागरिकांची सततची वर्दळ असते. भविष्यात वाहनांचा वाढता वेग लक्षात घेता अपघाताचा धोका नाकारता येत नसल्याने आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

“रस्त्याचे काम होत असल्याने नागरिकांची अनेक वर्षांची अडचण दूर होत आहे. मात्र रस्ता चांगला झाल्यानंतर वाहनांचा वेग वाढणार हे निश्चित आहे. गावांच्या हद्दीत, शाळांजवळ आणि बसथांब्यांजवळ स्पीड ब्रेकर करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात,” असे मत किवळे येथील दिपक मदगे यांनी व्यक्त केले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पवना नदीचे पाणी पिण्याअयोग्य, बंदिस्त जलवाहिनीबाबत तोडगा काढा ; खासदार श्रीरंग बारणे यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून बौर, ब्राह्मणवाडी, करूंज येथील प्रस्तावित एमआयडीसी संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न
– वडगाव मावळ येथे इंद्रायणी भात बियाण्याचे वितरण केंद्र सुरू ; शेतकऱ्यांना मिळणार उच्च दर्जाचे बियाणे


dainik maval jahirat

Previous Post

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

Next Post

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.