व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

याप्रकरणी राजू बर्मा माने (वय ३६, रा. दामूनगर, कांदिवली ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 4, 2026
in लोकल, शहर
Accident

File Image


Dainik Maval News : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लोणावळ्यात पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. रोडच्या कडेला उभा असलेल्या टाटा एस टेम्पोला पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्यांचे वडील गंभीर जखमी झाले आहेत, तर गाडीतील इतर प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात बुधवारी (दि. ३ जून) पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास लोणावळा येथील जैन सॅनिटोरियमसमोरील रस्त्यावर झाला.

याप्रकरणी राजू बर्मा माने (वय ३६, रा. दामूनगर, कांदिवली ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टाटा टेम्पो (क्रमांक MH 04 KU 9628) वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात अंबादास बर्मा माने (वय ३८, रा. कांदिवली, मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे, तर बर्मा मुकिंदा माने (वय ६५) हे गंभीर जखमी झाले आहेत.

लोणावळा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू माने, त्यांचा भाऊ मयत अंबादास माने, वडील बर्मा माने आणि इतर काही लोक त्यांच्या ताब्यातील टाटा एस टेम्पो (क्रमांक MH 47 BL7814) मधून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने मुंबईच्या दिशेने चालले होते. पहाटे ४:३० वाजण्याच्या सुमारास लोणावळा गावच्या हद्दीत एचपी (HP) पेट्रोल पंपाजवळ, जैन सॅनिटोरियमच्या समोर अंबादास माने यांनी लघुशंकेसाठी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. लघुशंका करून झाल्यानंतर पाठीमागील सर्व लोक गाडीत व्यवस्थित बसले आहेत की नाही, हे पाहण्यासाठी अंबादास हे गाडीच्या पाठीमागे गेले.

याच दरम्यान पुणे बाजूकडून मुंबईकडे जाणाऱ्या एका अज्ञात टाटा टेम्पो (क्रमांक MH 04 KU 9628) च्या चालकाने आपल्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगात आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणाने चालवला. या भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या टाटा एस गाडीला आणि पाठीमागे उभ्या असलेल्या अंबादास यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, गाडीच्या पाठीमागे उभे असलेले अंबादास माने यांच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच गाडीच्या आत व जवळ असलेले त्यांचे वडील बर्मा माने यांच्या छातीला, बरगडीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. गाडीतील इतर प्रवाशांनाही या अपघातात किरकोळ दुखापत झाली असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर अज्ञात टेम्पो चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या मार्गदर्शनानुसार पुढील तपास पोलीस हवालदार देविदास चाकणे करीत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना


dainik maval jahirat

Previous Post

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

Next Post

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Proposed Baur-Karunj-Brahmanwadi MIDC project Local villagers continue to oppose

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.