व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळमध्ये जनावरांची अमानुष वाहतूक उघड, दोन ट्रक ताब्यात, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 8, 2026
in लोकल, शहर
Vadgaon Maval Police Station

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

मावळ तालुक्यातील जांभुळ फाटा परिसरात गाई, बैल व वासरांची अमानुष पद्धतीने वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोन ट्रकांसह तब्बल २७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत योगेश संजय ढोरे (रा. वडगाव मावळ) यांनी फिर्याद दिली आहे. ४ जून २०२६ रोजी दुपारी ते व त्यांच्या सहकाऱ्यांसह जांभुळ फाटा परिसरात असताना दोन ट्रकमधून मोठ्या प्रमाणात जनावरांची वाहतूक होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला.

पोलिसांनी तपासणी केली असता एमएच-५०-१५९६ क्रमांकाचा ट्रक, ज्यावर “ज्योतिर्लिंग प्रसन्न” असे लिहिले होते, तसेच एमएच-१०-सीआर-४३३७ क्रमांकाचा “सिद्धनाथ प्रसन्न” नावाचा दुसरा ट्रक आढळून आला. या दोन्ही वाहनांमध्ये एकूण १४ गाई आणि १६ वासरे व बैल जातीची जनावरे कोंबून भरल्याचे आढळले.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, जनावरांना कोणत्याही प्रकारचे चारा-पाणी न देता अत्यंत दाटीवाटीने ट्रकमध्ये भरून त्यांची वाहतूक करण्यात येत होती. जनावरांना वेदना, त्रास आणि हालअपेष्टा सहन कराव्या लागतील अशा परिस्थितीत त्यांना वैयक्तिक स्वार्थासाठी कत्तलीच्या उद्देशाने नेले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीचे दोन ट्रक आणि ३ लाख १२ हजार रुपये किमतीची ३० जनावरे असा एकूण २७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अधिक गोरखनाथ कोळेकर (रा. तुर्भे, नवी मुंबई), रोहन नानासो बेंद्रे (रा. शिराळा, जि. सांगली) आणि कुंडलिक सर्जेराव बेंद्रे (रा. शिवरवाडी, ता. शिराळा, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६०, महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६, केंद्रीय मोटार वाहन कायदा १९८९ तसेच प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा क्रमांक १७२/२०२६ म्हणून दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आशिष काळे करीत आहेत. जनावरांच्या अवैध आणि अमानुष वाहतुकीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
– पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना
– भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी
– जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षिकेचा रस्ते अपघातात मृत्यू ; मावळमधील हृदयद्रावक घटना


dainik maval jahirat

Previous Post

प्रस्तावित बऊर-करुंज-ब्राह्मणवाडी एमआयडीसी प्रकल्प : स्थानिक ग्रामस्थांचा विरोधी सूर कायम

Next Post

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Crime

Vadgaon Maval : युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यास यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.