Dainik Maval News : पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दिनांक १३ जून २०२६ रोजी रात्री १२:०५ वा. पासून ते २६ जून २०२६ रोजी २४ वाजेपर्यंत वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका आदी इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना लागू राहणार नाही.
सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन

