व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 12, 2026
in पुणे, ग्रामीण, देश-विदेश, महाराष्ट्र, शहर
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : राज्य उत्पादन शुल्कच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत अंदाजे १ कोटी २० लाख ९६ हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा, १५ लाख रुपये किंमतीचे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी ३५ हजार ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी दिली आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह-आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता. प्रसाद सुर्वे तसेच पुणे विभागीय उप आयुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार गुणात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सी यांनी केलेल्या कारवाईत पुणे-मुंबई महामार्गावरील हवेली तालुक्यातील सुतारवाडी पाषाण एका कंटेनर वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याचे १ हजार २०० बॉक्स गोवा राज्यात निर्मित झालेली परंतु मध्य प्रदेश राज्यात निर्मित व विक्री असलेल्या बनावट लेबलांचा वापर करून “Royal Select Deluxe Whisky” या बँडचे विदेशी मद्य आढळून आले. वाहनातून १८० मि.ली. क्षमतेच्या बाटल्यांचे एकूण १० हजार ३६८ ब. लि. मद्य जप्त करण्यात आले.

मद्य वाहतुकीसाठी आवश्यक असलेला वैध वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता कोणताही वैध परवाना आढळून आला आहे. त्याच्याकडे कंट्रोल पॅनेल रिकामे बॉक्सचे बनावट टॅक्स इनव्हाईस अशी खोटी व बनावट कागदपत्रे सादर केली. तसेच वाहतुकीसाठी सादर करण्यात आलेली कागदपत्रेही संशयास्पद व बनावट असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले.

या गुन्ह्यामध्ये वाहनाचा चालक याना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५(अ) (ई), ८०, ८३, ८६, ९० व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मद्याचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून, सदर मद्य बनावट असल्याची शक्यता तपासली जात आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक संदीप कदम आणि त्यांच्या पथकाचा सहभाग होता.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने नागरिकांना अवैध गावठी दारूपासून दूर राहण्याच्या व अशा बेकायदेशीर धंद्यात गुंतलेल्याविषयी माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९ किंवा ०२०-२६९१७३२१ दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक अतुल कानडे यांनी केले आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
– पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर
– तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर
– मावळातील औद्योगिक पट्ट्याला मिळणार मोठी चालना; तळेगाव परिसरात नवीन रेल्वे मालधक्का उभारण्याचे नियोजन 


dainik maval jahirat

Previous Post

महत्वाची बातमी! पुणे ग्रामीण जिल्ह्यात १३ ते २६ जूनपर्यंत जमावबंदी आदेश

Next Post

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.