व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा ग्रामीण परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू; पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंध

मुसळधार पाऊस आणि संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन लोणावळा ग्रामीण परिसर हद्दीत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 7, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Tourist crowd increases in Andar Maval area Police take precautions to prevent ruckus

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुसळधार पाऊस आणि संभाव्य आपत्तीजन्य परिस्थिती लक्षात घेऊन लोणावळा ग्रामीण परिसर हद्दीत दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत कलम १६३ लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, प्रतिबंधित भागात जावू नये असे आदेशात म्हटले आहे.

Novel NIBR Ads

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकवीरा देवी, कार्ला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईट, लायन्स पॉईट, शिवलंग पॉईट, पवना डॅम अशी पर्यटनासाठी प्रसिध्द ठिकाणे आहेत. सध्या पावसाळा सुरु असून देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक लोणावळा व परिसरात भेट देण्यासाठी येत आहेत.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या अहवालानुसार, लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे, जितेंद्र डूडी यांनी., मौजे लोणावळा ग्रामीण परिसरात भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, पवना डॅम या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- २०२३ चे कलम १६३ नुसार दिनांक ३१ ऑगस्टपर्यंत सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता- २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.

या आदेशानुसार सायं. ६ ते स. ६ वाजेपर्यंत सदरठिकाणी खालील कृतींना प्रतिबंध
१) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व त्यामध्ये पोहणे.
२) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.
३) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्याचे कठडे, धोकादायक वळणे इ. ठिकाणी सेल्फी काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे.
४) पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गीक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे, अनधिकृत गद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.
५) वाहतुकीचे रस्ते, तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे.
६) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालवणे.
७) वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.
८) सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहत्य उघड्यावर व इतरत्र फेकणे.
९) सार्वजनिक ठिकाणी येणा-या महिलांशी छेडछाड करणे.
१०) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर्स/उफर वाजविणे व त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे.
११) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती न करणे.
१२) धबधबे, धरणे व नदी आदीच्या परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करणेत मनाई करणेत येत आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Next Post

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
Tourist crowd increases in Andar Maval area Police take precautions to prevent ruckus

लोणावळा ग्रामीण परिसरात ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू; पर्यटनस्थळांवर सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंध

July 7, 2026
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

July 6, 2026
पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू

July 6, 2026
Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.