व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 8, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

सुरुवातीला पिंपरी पोलिसांना हे कृत्य एखाद्या सराईत टोळीचे असावे असा संशय होता, मात्र तपासानंतर हे अपहरणकर्ते पुणे ग्रामीण पोलीस दलातीलच कर्मचारी असल्याचे समोर आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 8, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कारमधून लोणावळ्याला फिरण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांसह दुबईहून आलेल्या एका दाम्पत्याला अडवून गाडीत ड्रग्ज असल्याचे खोटे सांगत ६ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. तसेच ५ लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना तब्बल ७ तास ओलीस ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पीडित व्यक्तीने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ६ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Novel NIBR Ads

राज्य महामार्ग पुणे विभागाचे दोन पोलीस शिपाई, एक पोलीस नाईक यांच्यासह तीन वॉर्डन अशा सहा जणांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले जाणार असल्याचे राज्य महामार्गचे पोलीस अधिक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले. याप्रकरणी पुण्यातील विमाननगर येथील २८ वर्षीय तरुणाने कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी हे पुणे येथील एका कंपनीत काम करतात. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी (२८), त्यांची पत्नी आणि मेव्हणे सय्यद जुबेर अहमद हे काही दिवसांपूर्वीच दुबईहून पुण्यात फिरण्यासाठी आले होते. ६ जुलै २०२६ रोजी हे चौघे जण कारमधून रात्री ८:३० च्या सुमारास लोणावळ्यातील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन येथे फिरण्यासाठी निघाले होते.

कार कामशेत परिसराजवळ पोहोचली असता, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ६ अज्ञात पोलिसांनी प्रवाशांची गाडी अडवली. “आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे,” असा बहाणा त्यांनी केला. गाडीत काहीही संशयास्पद नसताना त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना धमकावण्यास सुरुवात केली. तुमच्या गाडीत गांजा किंवा ड्रग्ज आहे, ते काढून द्या. नाहीतर तुमच्यावर मोठी कारवाई करू, अशी धमकी त्यांनी दिली.

यादरम्यान आरोपी पोलिसांना कारमध्ये अँबर लीफ कंपनीचे एक सिगारेटचे पाकीट सापडले. याच पाकिटावरुन धमकावत, पोलीस कारवाई नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी थेट खंडणीची मागणी या पोलिसांनी केली. त्या पोलिसांनी कारमधील सर्वांचे मोबाईल काढून घेत कोणाशीही संपर्क साधू दिला गेला नाही. त्या पोलिसांनी चौघांना त्यांच्याच कारमध्ये डांबून ठेवले आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ७ तास त्यांना ओलीस ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. शेवटी, ५ लाख रुपये वसूल करण्यासाठी हे पोलीस पर्यटकांना तळेगाव येथील एका एटीएम सेंटरवर घेऊन गेले.

मोबाईल हिसकावले असले तरी एका तरुणाच्या हातातील स्मार्ट वॉचकडे आरोपी पोलिसांचे लक्ष गेले नाही. याचाच फायदा घेत, एका तरुणाने गुपचूप आपल्या स्मार्ट वॉचवरून पुण्यात राहणाऱ्या एका मित्राला इमर्जन्सी हेल्पचा मेसेज पाठवला. त्या मित्राने तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि त्यांचे तीन उपायुक्त तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. पिंपरी पोलिसांची पथके तळेगावच्या दिशेने रवाना झाली. आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आणि पर्यटक इतर पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे लक्षात येताच, कारमध्ये बसलेले दोन आरोपी पोलीस तातडीने उतरले आणि आपल्या कारमधून पसार झाले.

सुरुवातीला पिंपरी पोलिसांना हे कृत्य एखाद्या सराईत टोळीचे असावे असा संशय होता, मात्र तपासानंतर हे अपहरणकर्ते पुणे ग्रामीण पोलीस दलातीलच कर्मचारी असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे पोलीस वर्तुळात तीव्र संताप आणि खळबळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पोलिसांवर काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १२७(२), ३०८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश घनश्याम पवार करत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
– पाटण (ता. मावळ) दरड दुर्घटना । ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकाचा मृत्यू, अन्य दोघांचा शोध सुरू
– पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


dainik maval jahirat

Previous Post

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

Next Post

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
Bridge at Mhalunge on Talegaon-Chakan-Shikrapur route closed until July 14 due to heavy rainfall

अतिवृष्टीमुळे तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावरील म्हाळुंगे येथील पूल १४ जुलैपर्यंत बंद ; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध

July 8, 2026
Tourists abducted by police on Lonavala highway ransom demanded but smartwatch led to their rescue

रक्षकच बनले भक्षक! लोणावळा हायवेवर पोलिसांकडूनच पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागितली, ‘स्मार्ट वॉच’मुळे बचावले

July 8, 2026
Patan Village Maval landslide accident parents and Son tragically died in landslide in morning

पाटण मावळ दरड दुर्घटना : वर्षभरापूर्वीच मुलाचं लग्न, सून गरोदर म्हणून गावी; पहाटे दरड कोसळून लेकासह आई-वडिलांचा करुण अंत

July 7, 2026
kasarsai dam maval mulshi

Maval Taluka Rain : मावळातील धरणांमधील पाणीसाठ्यात कमालीची वाढ; वाडीवळे, लोणावळा, जाधववाडी धरणे फुल्ल

July 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.